परदेश दौरे करत भारताची बदनामी करण्याची सवय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाही, हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेने उबाठाला अडवून त्यांच्या पक्षाचा अजेंडा आणि उबाठा गट जिरवण्याचे काम केले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी

.

नवनाथ बन म्हणाले की, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसला विदेशातून किती हजार कोटी रुपयांचा फंड आला आहे, हे राऊतांनी सांगितले पाहिजे. त्यामध्ये उबाठाला आणि राऊतांना किती कोटींचा वाटा मिळाला, याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. भाजपला पराभूत करण्यासाठी किती देश राहुल गांधींना मदत करत आहेत, याचे उत्तर राऊतांनी दिले पाहिजे. परदेशातून अजेंडा घेऊन राहुल गांधी भारतात येतात. राऊतांना टिपू सुलतानचा पुळका येत आहे. हिंदुविरोधी असलेल्या टिपू सुलतानचा गौरव करण्याचे काम काँग्रेसकडून करण्यात आले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

नवनाथ बन म्हणाले की, दुष्काळाच्या संकटामध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आदित्य ठाकरे, तुमच्यासारखे ‘देवाभाऊ’ घरात बसलेले नाहीत. उद्धव ठाकरेंचे सरकार असताना अडीच वर्षे उद्धव ठाकरे घरात बसून कारभार करत होते. ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यावेळी शेतकऱ्यांनी तोंडावर सांगितले की तुम्ही दिलेली मदत आमच्यापर्यंत पोहोचली नाही, कर्जमाफीची दमडीही मिळाली नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आणि ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरसुद्धा गेले. शेतकऱ्यांना साथ आणि आधार देण्याचा प्रयत्न देवाभाऊंकडून सुरू आहे. त्यातच दोन लाख रुपयांची कर्जमाफी झाली. आदित्य ठाकरे मात्र घरात बसून आहेत. तुम्ही ना शेतकऱ्यांच्या बांधावर जाता, ना शेतकऱ्यांना मदत करता. आदित्य ठाकरे यांनी साधा बिस्किटाचा पुडा तरी शेतकऱ्यांना मदत म्हणून दिला का, हे जाहीर करा आणि मग महायुतीवर टीका करा, असा टोला बन यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

सोन्याचे दर कमी झाल्याने मोदींचे शब्द खरे ठरले

नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केले होते की वर्षभर सोने खरेदी करू नका; आज ते किती खरे बोलत होते हे जनतेच्या लक्षात येत आहे. त्यावेळी जर जनतेने सोने खरेदी केले असते तर सोन्याचा दर जास्त होता. आज तो कमी झाला आहे; त्यामुळे त्यावेळी सोने खरेदी करणाऱ्यांचे नुकसान झाले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या फायद्यासाठी भाकीत करत असतात; पण राऊतांचे एकही भाकीत आजपर्यंत खरे झाले नाही. दिशाभूल करण्याचा तुमचा प्रयत्न आहे, हे जनतेने ओळखले आहे. तुमच्या पाठीशी कोणी नाही, हे तुम्ही ओळखले पाहिजे.

आमदार-खासदार जनतेच्या प्रेमाने जिंकता येतात

नवनाथ बन म्हणाले की, आमदार-खासदार विकत घेण्यासाठी पैसे लागत नाहीत. नाहीतर तुम्ही जमा केलेल्या पैशातून अनेक आमदार-खासदार विकत घेतले असते; पण त्यासाठी प्रेम असावे लागते. काँग्रेसला विदेशातून अनेक फंड येतात, त्या जीवावर राहुल गांधींनी अनेक आमदार-खासदार विकत घेतले असते; पण त्या पैशाच्या जीवावर आमदार-खासदार विकत घेता येत नाहीत. उबाठा गटाकडे 100 कोटी वसुलीतून जमा झालेल्या पैशातून तर ते विकत घेऊ शकले असते. लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रेम हवे असते आणि जनतेची कामे करणे महत्त्वाचे असते. जनतेची कामे भाजप आणि एनडीए करते.

हे ही वृत्त वाचा

आनंदराज आंबेडकरांचे विधान चुकीचे:टिपू सुलतान कोण, हे सरकारने स्पष्ट करावे, मोदी केवळ ज्ञानेशकुमारांचे पंतप्रधान- संजय राऊत

आनंदराज आंबेडकर यांनी केलेले विधान चुकीचे आहे. दिवंगत व्यक्तीविषयी असे काही बोलू नये; पण सरकारने केलेले विधान सुद्धा चुकीचे आहे. पाऊस पडलाच नाही तर पाणी कुठून आणायचे आणि कुठून जिरवायचे? त्यापेक्षा या सरकारने भ्रष्टाचारातील पैसे अडवा आणि पैसा जिरवा आणि घरी न्या, अशी घोषणा दिली पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin