धानोरा जि.प.केंद्र शाळेचा बोजवारा:5 ते‎ 6 फूट खोल खड्डे उघडेच, अपघाताचा धोका‎, 15 वर्षांपासून एकच मुख्याध्यापक ठाण मांडून; संतप्त पालकांकडून बदलीची मागणी‎



चोपडा तालुक्यातील धानोरा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा कारभार सध्या कमालीचा रामभरोसे चालला असून, शाळेतील गंभीर समस्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत जवळपास २५० विद्यार्थी शिक्षण घ

.

शाळा परिसरात एका ठिकाणी तब्बल ५ ते ६ फूट खोलीचे पाच मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून हे खड्डे अत्यंत निष्काळजीपणे असेच उघडे सोडून देण्यात आले आहेत. या सर्व गैरसोयींमागे शाळा प्रशासनाचे आणि मुख्याध्यापकांचे ढिसाळ नियोजन कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुख्याध्यापक गेल्या १५ वर्षांपासून याच शाळेत ठाण मांडून आहेत. इतकी वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असूनही शाळेचा कोणताही भौतिक विकास झालेला नाही, उलट सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे या मुख्याध्यापकांची येथून तत्काळ बदली करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता पालकांनी आणि ग्रामस्थांनी लावून धरली आहे. पहिली ते चौथीमधील लहान मुले खेळताना किंवा धावताना या खड्ड्यांमध्ये पडून मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर धोक्याकडे शाळा प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केली असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेत विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने पालक संतप्त झाले असून पुढील काळात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शाळेत भौतिक सुविधांचा उडाला बोजवारा

^लहान मुले खेळताना खड्ड्यात पडली आणि काही बरे-वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? गेल्या पंधरा वर्षांत शाळेची अवस्था सुधारण्याऐवजी खालावत चालली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष घालून मुख्याध्यापकांची बदली करावी आणि शाळेतील समस्या सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” माया सोनवणे, पालक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *