महिला आरक्षणासाठी CM फडणवीस राजीनामा देणार का?:सुषमा अंधारे यांचा सवाल- फुलेंचे गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूडचे RSSच्या कार्यक्रमात वाचन करणार का?
![]()
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मंजूर होत नसल्याने पदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले नाही म्हणून, राजीनामा देणार का?, असा तिखट सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज विचारला. महात्मा फुले वाडा विकसित करण्यासाठी राज्य सरकारने एका स्वयंसेवी संस्थेला देण्याचा घाट घातला होता, असा आरोपही अंधारे यांनी केला. देवेंद्र फडणवीस महात्मा फुलेंच्या गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड यांचे जाहीर वाचन रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात करताल का? मोहन भागवत यांचे या पुस्तकावर काय मत आहे, हे फडणवीसांनी जाणून घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.डिलिमीटेशन आणि महिला आरक्षण विधेयक वेगळे असताना ते एकच आहे असे का सांगितले, असा सवालही त्यांनी केला. हिंदू कोडबिलाची भ्रूणहत्या कोणी केली? सुषमा अंधारे म्हणाल्या की, गोध्रा दंगलीवेळी एखादं बाळ खडकावर आपटून मारले जात असताना ज्यांनी त्यांचे रिपोर्टिंग केले आहे, किंवा ते वाचले आहे त्यांना कळेल भ्रूणहत्या काय असते. 1951 मध्ये भ्रूणहत्या झाली ती कोणी केली? हिंदू कोडबिल मांडले तेव्हा ती कोणी केली? ही भ्रूणहत्या रा.स्व. संघाच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बिल मंजूर होत नसल्याने पदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का? असा सवाल अंधारे यांनी केला आहे. अंधारेंचे लाव रे तो व्हिडिओ सुषमा अंधारे म्हणाल्या की, 2023 मध्ये महिला आरक्षणाचे बिल पास झाले असताना अमित शहा यांनी संसदेत काय भाषण केले याचा व्हिडिओ दाखवला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणाचा व्हिडिओसुद्धा दाखवला ज्यात मोदींनी 33 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित होणार आहे, असे सांगितल्याचे दिसत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणाचा देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला असेल म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. फडणवीसांनी त्या ट्विटवर बोलावे सुषमा अंधारे म्हणाल्या की, महिला आरक्षण विधेयक 2026 मध्ये मंजूर होणार होते असे जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर 2023 मध्ये काय ट्विट होते हे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सांगावे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, लोकसभेने महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजुने 454 मते पडली लोकसभा, आणि विधानसभेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळेल. मग ते ट्विट का केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट वाचून दाखवले मग हे ट्विट तेव्हा का केले होते हे फडणवीसांनी सांगावे. असेच एक ट्विट अमित शहा यांनी सुद्धा केले आहे. त्यांनी दोन ट्विट केले यामध्ये एक विधेयक मंजूर करण्यापूर्वी आणि एक विधेयक मंजूर झाल्यानंतर केले आहे. फडणवीस यांनी यावर सुद्धा बोलले पाहिजे. त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेत सुद्धा हे विधेयक पास झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी केल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. उत्तर-दक्षिण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे म्हणाल्या की, सन 2011 च्या जनगणनेच्या आधारावर महिला विधेयक का मांडले, याचे उत्तर सरकार देत नाही, असे अंधारे म्हणाल्या. केंद्र सरकार दक्षिण भारतातील राज्यांची मतदारसंघ पुनर्रचनेत गळचेपी करत आहे. भाजप लोकसंख्या वाढीवर आधारित मतदारसंघ पुनर्रचनेनुसार लोकप्रतिनिधी ठरवण्याबाबत उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
