महागडे मोबाईल, मुलींवर खर्च आणि फसवणूक:चैनीसाठी आईचे दागिने विकले; अयानच्या आयुष्याचा काळा पैलू समोर, बंदुकीबाबतही स्पष्टीकरण

0
730-x-548-new-2026-04-21t111840325_1776752469.jpg




परतवाडा येथील लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ व्हायरल आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत एकामागोमाग एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. चौकशीदरम्यान अयानने आपल्या विलासी सवयी पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आईचे दागिने चोरून विकल्याचे उघड झाले आहे. त्याच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये दिसणारी पैशांची बंडले ही प्रत्यक्षात या दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि ब्रँडेड मोबाईल वापरण्याची सवय होती. या सवयी पूर्ण करण्यासाठी तो सतत पैशांच्या शोधात होता. आर्थिक अडचणीत सापडल्यावर त्याने थेट घरातील सोन्याच्या वस्तूंवर डल्ला मारला. आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून विकल्याचे उघड झाले असून, यामुळे त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात समोर आलेली आणखी एक बाब म्हणजे अयानच्या सोशल मीडियावरील दिखाव्याचा खरा चेहरा. त्याच्या रिल्समध्ये मोठ्या प्रमाणात पैसे आणि महागड्या वस्तू दाखवून तो स्वतःची प्रतिमा तयार करत होता. मात्र, या सगळ्यामागे बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला पैसा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणारे आयुष्य आणि वास्तव यामध्ये मोठा फरक असल्याचे या घटनेतून दिसून येते. दरम्यान, अयानचा थार गाडीतील आणि चार आयफोनसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या गाडीबाबतही मोठा खुलासा झाला आहे. अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत दिसत होता, ती गाडी परतवाड्यातील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. त्यांचे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान असून, या प्रकरणानंतर त्यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX या प्लॅटफॉर्मवरून झाली होती. मोबाईल खरेदीच्या निमित्ताने त्यांची भेट झाली होती. त्यावेळी अयानने स्वतःला ‘रील क्रिएटर’ असल्याचे सांगत गाडीसोबत व्हिडीओ बनवण्याची परवानगी मागितली होती. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडीओ शूट करू दिला, असे त्याने स्पष्ट केले. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या बंदुकीबाबतही स्पष्टीकरण याच व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या बंदुकीबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही बंदूक प्रत्यक्षात खरी शस्त्र नसून शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी एअर गन असल्याचा दावा आर्यनने केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks