मला काही झाले तर संभाजी भिडेंचे धारकरी जबाबदार:माझ्या जीवितास धोका, संरक्षण द्यावे; विकास लवांडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-20t171827970_1776685679.jpg




राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. वारकरी संप्रदायाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लवांडे यांना या धमक्या येत असल्याचे समजते. यावरून विकास लवांडे यांनी ट्विट करत संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच मला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणावसी यांच्याकडे केली आहे. विकास लवांडे म्हणाले, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र पोलिस आपणास पुनश्च विनंती की, मला संभाजी भिडे यांचे धारकरी आणि काही हिंदुत्ववादी बुवा बाबांचे समर्थक मला फोन करून दररोज शिवीगाळ, दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. मेसेज करत आहेत, फोन करून त्रास देत आहेत. मी कुठेही कोणाचाही कसलाही अवमान केलेला नाही. मी वारकरी संप्रदायाचा एक पाईक आहे. पुढे विकास लवांडे म्हणाले, भागवत वारकरी संप्रदायाच्या संदर्भात तात्विक वैचारिक मांडणी करत आहे. मात्र माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच पंढरपूर, श्रीरामपूर, नेवासा इत्यादी ठिकाणी माझ्या विरुद्ध खोट्या निराधार तक्रार अर्ज देऊन गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मला फोन करून मेसेज करून त्रास देणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी. मी कायदा आणि लोकशाही पाळणारा जबाबदार कार्यकर्ता आहे. माझ्या जीवितास काही कमी जास्त झाल्यास मला फोन करणारे संभाजी भिडे यांचे धारकरी आणि कट्टर हिंदुत्ववादी सर्वस्वी जबाबदार राहतील त्यांनी यापूर्वी सुद्धा मला एक वर्षापूर्वी धमक्या व घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता. तसेच मला संरक्षण मिळावे, अशी मागणी विकास लवांडे यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी म्हणजे 17 एप्रिल रोजी विकास लवांडे यांनी ट्विट करत म्हटले होते की, भास्कर गिरी महाराजांचे नेवासा भागातील हिंदुत्ववादी भक्त मला सकाळपासून फोन करून जीवे मारण्याची दमबाजी, शिवीगाळ करत आहेत. याचा अर्थ तिकडे किती कट्टरवाद जोपासला गेला आहे ते कळते. खरे वारकरी असे हिंसक गुंड प्रवृत्तीचे नसतात. केवळ धर्मांध रुजवली आहे. मला दमबाजी, धमक्या, शिवीगाळ करणाऱ्या व फोन, मेसेज करून जाणीवपूर्वक रीतसर कायदेशीर तक्रार करतोय, अशी माहिती त्यांनी दिली होती.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks