मिशन कर्मयोगीउपक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेचा राज्यात डंका:95 टक्के कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करत प्रथम क्रमांक

0
whatsapp-image-2026-04-19-at-23546-pm_1776590802.jpeg




केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. देशभरातील राज्याच्या कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हयाचा मोलाचा सहभाग रहिला आहे. हिंगोली जिल्हा परिषद प्रथम आल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. या प्रशिक्षणामुळे आता कामांमध्ये अचूकता अन गतीमानता येणार आहे. केंद्र सरकारने मिशन कर्मयोगी उपक्रम देशभरात हाती घेतला आहे. या उपक्रमांमध्ये विविध प्रशिक्षण, अभ्यासक्रमासह इतर उपक्रम जिल्हा परिषद व इतर शासकिय कार्यालयांनी राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अभियानांतर्गत केंद्राच्या सूचने नुसार ता. २ ते ता. ८ एप्रील या कालावधीत साधना सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहात जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून एआय च्या प्रशिक्षणासोबतच इतर चार तासाचे प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, समाज कल्याण अधिकारी गिता गुठ्ठे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांमधून सुमारे ५०९८ कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ५०२२ कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण केले. तर ४७२२ कर्मचाऱ्यांनी चारतासाचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यामुळे राज्यात इतर जिल्हयांच्या तुलनेत हिंगोली जिल्हा परिषदेच्या ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याचे कळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. देशभरात या अभियानांमध्ये महाराष्ट्राने मोठी कामगिरी केली असून राज्याच्या या कामगिरीमध्ये हिंगोलीचा मोलाचा सहभाग राहिला आहे. या शिवाय मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद (९० टक्के) सहाव्या क्रमांकावर, नांदेड जिल्हा परिषद (८५टक्के) चौदाव्या क्रमांकावर, लातुर जिल्हा परिषद (८४ टक्के) सतराव्या क्रमांकावर, जालना जिल्हा परिषद (८३ टक्के), एकेवीसाव्या क्रमांकावर, बीड जिल्हा परिषद (७८ टक्के) सव्वीसाव्या क्रमांकावर, धाराशिव (७४टक्के) एकतीसाव्या तर परभणी जिल्हा परिषद (६८ टक्के) बत्तीसाव्या क्रमांकावर आली आहे. कामामध्ये सुधारणा अन गतीमानता येणार – सीईओ विवेक गायकवाड हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला हि जिल्हयासाठी आनंदाची बाब आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा येणार असून कामात गतीमानता व अचुक कामे होतील. त्यामुळे प्रशासन गतीमान होऊन नागरीकांची कामे जलदगतीने होतील.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks