'जनाब' म्हणवून घेताना हिंदूंची आठवण आली नाही का?:धर्मांतराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गप्प; मतांसाठी तडजोड केली- नवनाथ बन

0
new-project-2026-04-19t143534837_1776589508.jpg




हिंदू खतरे मै कुठे आहे असा सवाल संजय राऊत विचारत आहेत, 1992 ला शिवसेना रस्त्यावर उतरली हे सांगत आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहे, औरंगजेब फॅन क्लब चालवत आहात? अफजल खानाच्या पिल्लावळींना सांभाळत आहात? आता अचानक तुम्हाला हिंदूंबद्दल ऐवढी काळजी वाटू लागली का? आजान स्पर्धेवेळी ही काळजी कुठे गेली होती, जनाब राऊत म्हणून घेत होतात तमेव्हा काळजी नव्हती का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन म्हणाले की, जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख झाला त्यावेळी तुम्ही गप्प होतात त्यावेळी तुम्हाला हिंदूची काळजी नव्हती का? याकूब मेमनच्या कबरींचे सुशोभीकरण झाले त्यावेळी तु्म्हाला हिंदूची काळजी नव्हती का? महाराष्ट्रात अनेक धर्मांतरण झाले त्यावेळी तुम्हाला हिंदूची काळजी नव्हती का? टीसीएसवर बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंची झाली नाही. म्हणून त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. तुम्हाला दाढ्या कुरवळायच्या आहेत हे जनतेला माहिती आहे. उबाठा गट लुळा-पांगळा नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटे बोलण्याचा राष्ट्रीय रोग झाला आहे असे संजय राऊत यांनी टीका केली होती यावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, जनतेने तुम्हाला लुळं पांगळं केले आहे. विधानसभा निवडणूक असो स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक उबाठा गट लुळा-पागळा केला आहे. नरेंद्र मोदी हे आजार नाही तर देशाचा आधार आहेत. ते राष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहे. राऊतांनी पाकिस्तानी जनतेला संबोधित करावे नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांना देशाबद्दल काही वाटत नाही कारण त्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे. महिला विधेयक बिल मंजूर झाले नाही हा देशाला अपमान झाला आहे. महिलांना सन्मान देण्याचा तो प्रयत्न भाजप सरकारने केला, पण तुम्ही ते मंजूर न करू देत नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम केले आहे. 2023 मध्ये तत्वत मान्यता मिळालेल्या या विधेयकाच्या अंमलबजावणीस अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला, याचा हिशेब जनता नक्कीच घेईल. तुम्ही माध्यमांचा वापर कसा करायचा हे सांगू नका. राऊतांनी पाकिस्तानच्या जनतेनला संबोधित करावे त्यांना तिथले लोकं ऐकतील. उबाठाची अवस्था बघा नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचे नाव किती वेळा घेतले हे मोजत बसण्यापेक्षा आपल्यापक्षाची अवस्था बघितली असती तर किमान उबाठा गट महाराष्र्टात वाढला असता. काँग्रेस मुक्त देश करण्याचे काम जनतेने केले आहे. काँग्रेसला किंमत नाही हे जनतेने दाखवून दिले आहे. लोकसंख्या वाढल्याने खासदारांची संख्या वाढणे गरजेचे आहे. तुम्ही त्याला विरोध का केला. दक्षिण राज्यातील खासदार संख्या वाढणार होती त्यांचे संजय राऊत यांनी नुकसान केले आहे. त्यावेळी मोदी सरकार गप्प बसले नाही नवनाथ बन म्हणाले की, पहलगाम हल्यानंतर मोदी सरकार गप्प बसले नाही. हल्ला करणाऱ्या एकाएका दहशतवाद्यांना मारण्याचे काम सैनिकांनी आणि मोदी सरकारने केले आहे. उलट पहलगाममध्ये धर्म विचारत लोकांना मारलेच नाही असे मुक्ताफळे काँग्रेसच्या लोकांनी उधळली होती. त्यावर संजय राऊत गप्प बसले होते. उत्तर VS दक्षिण संघर्ष इंडिया आघाडीला पेटवायचा आहे. कारण त्यांना वाटते की यामुळे आपल्याला राजकीय फटका बसू शकतो.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks