विधान परिषदेच्या मतदानाला संभाजीनगर येथील 5 तर पैठणचा 1नगरसेवक गैरहजर:3 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत, 22 जूनला निवडणुकीचा फैसला‎



औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी ९८.९० टक्के मतदान झाले. दोन्ही जिल्ह्यांतील ६३७ मतदारांपैकी ६३० जणांनी मतदानाचा हक्क बजावला, तर संभाजीनगर येथील ५ तर पैठणचा १ नगरसेवक गैरहजर राहिले. दरम्यान, महायु

.

सकाळी ८ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष ग्राउंडवर मोठी लगबग पाहायला मिळाली. सर्वाधिक १३७ मतदार असलेल्या छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयाच्या केंद्राबाहेर चोख बंदोबस्त होता. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः केंद्रावर उपस्थित राहून पाहणी केली. सकाळी ९ वाजता भाजपचे नगरसेवक एकत्र दाखल झाले आणि ११ वाजेपर्यंत महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी मतदान पूर्ण केले. त्यानंतर १२ च्या सुमारास एमआयएमच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन मतदान केले. उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी, प्रहार आणि अपक्ष मतदारांनी एक-एक करून येत मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ४ वाजता मतदान संपल्यानंतर सर्व मतपेट्या पोलिस बंदोबस्तात रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात रवाना केल्या असून, रात्री उशिरा स्ट्राँगरूम सील करण्यात आली आहे.

मतदान संपताच मंत्री सावेंची बँकेसाठी फील्डिंग अतुल सावे यांनी मनपा, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेनंतर आता जिल्हा बॅंकेवर लक्ष केंद्रित केले. जिल्ह्यात अतुल सावे यांच्या नेतृत्वाची उंची वाढलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानात कमालीची गंभीरता सावे यांनी बाळगली. मतदान आपल्या बाजूने असताना कुठेही गाफील राहण्याची चूक केली नाही. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना मतदान कामात सहभागी करून घेतले. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद निवडणुकीवर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हाती घेण्यासाठी तयारी केली आहे.

मतदान केंद्रावर मंत्री, लोकप्रतिनिधी ठाण मांडून मतदान फुटण्याच्या भीतीपोटी भाजपने महायुतीच्या सर्व मतदारांचे सकाळी ९ वाजताच मतदान करून घेतले. मतदान झाल्यानंतर मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, महापौर समीर राजूरकर, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडून होते. दरम्यान, एकमेकांची खेचाखेची करण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी केले. एमआयएमचे मनपा विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी सर्वांना एकत्र करून मतदान करून घेतले. राजेंद्र दानवे हे सकाळपासून मतदान केंद्रावर ठाण मांडून होते.

रुग्णवाहिकेमधून येत मतदान हक्क बजावला सिल्लोडच्या नगरसेविका स्नेहल शिनगारे यांनी प्रसूतीची वेळ जवळ आलेली असतानाही रुग्णवाहिकेतून येत मतदान केले. त्यांच्या धाडसाचे प्रत्यक्षदर्शी आणि अधिकाऱ्यांनी कौतुक केले. तर, नगरसेविका सत्यभामा शिंदे यांची तब्येत खराब असतानाही त्यांनी केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *