शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे साेमवारपासून आंदोलन:दहावी-बारावीच्या निकालावर परिणाम हाेण्याची चिन्हे

0
new-project-2026-04-19t103025057_1776574805.jpg




माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील कर्मचारी संघटना आणि बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ यांनी सोमवार (दि. 20) पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. याचा परिणाम पेपर तपासणी आणि पर्यायाने दहावी-बारावीच्या निकालावर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मंडळातील बढती व बदली संदर्भातील पूर्वनियोजित निकष रद्द करून नव्याने शासनपद्धती लागू केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. नोव्हेंबर 2025 पासून नियुक्त आयएएस अधिकाऱ्यांच्या निर्णयशैलीवर “हुकूमशाही”चा आरोप होत आहे. मंडळ ही स्वायत्त संस्था असल्याने व मंडळाची महाराष्ट्रभर नऊ कार्यालय असल्याने कर्मचाऱ्याऱ्यांच्या बढती, बदली संबंधी मंडळ प्रशासन व कर्मचारी संघटनांसोबत करार होऊन बढतीसंबंधी निकष तयार करण्यात आलेले होते. मात्र, मंडळात नोव्हेंबर 2025 पासून आयएएस अधिकारी राज्यमंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. सदर अधिकाऱ्याने मंडळाच्या कामकाजाची व कर्मचाऱ्यांची कोणतीही पूर्वमाहिती न घेता हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी करताना थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कामाचा अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ताण मंडळात एकूण 891 पदांपैकी तब्बल 386 पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन अपरिहार्य ठरत असून, त्याचा थेट परिणाम दहावी-बारावीच्या निकाल प्रक्रियेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तातडीने तोडगा काढण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks