पंधरा दिवसांपासून मलकापूरसह शिवणीतील नळांना थेंबही नाही:बुस्टर पंप जळाल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटंकती सुरू
![]()
गेल्या पंधरा दिवसापासून प्रभाग क्रमांक १४ मलकापूर, शिवनी भागाला पाणीपुरवठा करणारा बुस्टर वीज पंप नादुरुस्त झाल्यामुळे या भागात पाणीपुरवठा न झाल्याने ऐन उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा प्रश्न तात्काळ स
.
मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘बूस्टर वीजपंप काही दिवसांपूर्वी दुरुस्त करण्यात आला होता. परंतु ग्रामपंचायत अस्तित्वात असतानापासूचा १४ वर्षे जुना बुस्टर पंप असल्याने वारंवार तो जळून नादुरुस्त होत आहे. परिणामी मलकापूर, शिवणी परिसरासह वाढीव वस्तीतील नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळा आला की वाढत्या तापमानामुळे हा बुस्टर पंप नादुरुस्त होतो. या पंपाची कार्यक्षमता संपल्याने मलकापूर शिवनी करता नवीन बूस्टर पंप उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक पराग गवई यांनी केली आहे.
मलकापूर, शिवनी भागात तसेच प्रभागातील अनेक भागांमध्ये पाण्याची जलवाहिनी नसून, तसेच अनेक भागांमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतची पाण्याची जुनी जलवाहिनी आहे. त्यामध्ये पाणी येत नाही. त्यामुळे त्या भागात पाण्याची कुठली व्यवस्था नाही. अकोला शहरातील उन्हाळा बघता नागरिकांना पाण्यासाठी कुठले त्रास होऊ नये. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये करता टँकरची व्यवस्था करण्यात यावी तसेच प्रभागातील बंद पडलेले हॅन्ड पंप दुरुस्त करून देण्यात यावे. तसेच खडकी ते मलकापूर या भागात नवीन मोठी पाण्याची जलवाहिनी टाकण्यात यावी.’ अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांकडूनवारंवार करण्यात येत आहे.
