उद्धव ठाकरे धर्मांतर प्रकरणावर मूग गिळून गप्प का?:ॲक्सिस बँकेत धर्मांतर नाही तर लैंगिक छळाची चौकशी झाली- नवनाथ बन
![]()
अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत धर्मातरांचा प्रकार झाला होता असे सांगितले नाही तर लैंगिक छळाचे प्रकरण झाले होते आणि या प्रकरणी रितसर चौकशी केल्याचे सांगितले. लैंगिक छळाबद्दलच बोलायचे झाले तर पाटकर फाईल्समध्ये तुम्ही एका महिलेबद्दल काय बोलला, त्यांच्यावर कसा अन्याय केला, हे पाटकर फाईल्समध्ये महाराष्ट्राने ऐकले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची टीसीएस प्रकरणी काय भूमिका आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाचे प्रकरण सुरू आहे, त्यावर उद्धव ठाकरे मुक गिळून गप्प आहेत, त्यावर काहीच बोलत नाही. संजय राऊत उद्धव ठाकरेंना त्यावर बोलायला सांगा. प्रियांका चतुर्वेदींनी आरसा दाखवला नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आरसा दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट बघण्यापेक्षा चतुर्वेदींनी केलेले ट्विट राऊतांनी बघितले तर त्यांचे डोळे उघडतील. महिला आरक्षणाचे समर्थन करण्याचे काम त्यांनी केले मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी नारी शक्तीच्या हिताची भूमिका घेतली. तुम्हाला महिलांबद्दल अभिमान वाटत नाही म्हणून तुम्ही विरोधात भूमिका घेतली. नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम तुम्ही केले आहे, महिला तुम्हाला माफ करणार नाही. मोदी-शहा यांच्यात संघर्षाचा राऊतांचा दावा हास्यास्पद नवनाथ बन म्हणाले की, आम्ही भाजपमध्ये काम करतो. आमच्या पक्षात उबाठासारखे भांडणं नसतात. आम्ही देश प्रथम, मी पक्ष अशा भूमिकेतून काम करत असतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्यात संघर्ष आहे असा हास्यास्पद आरोप राऊत करत आहे. तुमच्या पक्षात एकमेकांच्या विरोधात तुम्ही उभे राहतात. आमच्याकडे जनतेचे हित पाहिले जाते. उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष निर्माण करण्याचा डाव नवनाथ बन म्हणाले की, महिला आरक्षणाच्या निमित्ताने उत्तर VS दक्षिण संघर्ष इंडिया आघाडीला निर्माण करायचा आहे. विधेयकामुळे दक्षिणेतील राज्यावर अन्याय होणार नव्हता तर खासदारांची संख्या वाढणार होती. तुम्हाला देशाचे हित नको होते म्हणून तुम्ही या विधेयकाला विरोध केला आहे. दक्षिणेचे हित तुम्हाला नको असल्याचे काल दिसून आले. नारी शक्ती आणि दक्षिणेतील राज्य तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही महिलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
