नायलाॅन मांजाच्या जखमींना भरपाई द्या, अन्यथा कलेक्टरच्या खिशातून वसुली:हायकोर्टाचा संभाजीनगर, जळगाव व नगर जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
![]()
नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या ११ जणांना भरपाई देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारवर संताप व्यक्त केला. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी ४ मेपर्यंतची शेवटची मुदत दिली आहे.
.
रक्कम न मिळाल्यास छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल. तसेच, विलंबासाठी प्रतिदिन प्रति लाभार्थी १,००० रुपये दंड त्यांच्या स्वतःच्या खिशातून वसूल केला जाईल, असा कडक इशारा न्यायालयाने दिला आहे.
धोरणासाठी २ महिन्यांचा वेळ हवा
राज्य सरकारने नवीन सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी २ महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यावर धोरणात केवळ सरकारी तिजोरीवर भार न टाकता संबंधित दुकानांची तपासणी करणाऱ्या निरीक्षकांवरही जबाबदारी निश्चित करावी, असे कोर्टाने म्हटले.
