खरातच्या अटकेला एक महिना; 9 गुन्हे, 58 क्लीप, 130 खाती:नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्हे दाखल
![]()
स्वतःला देवाचा अवतार भासवून महिलांचे लैंगिक शोषण आणि व्यावसायिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय पूर्णपणे खोलात गेला आहे. १७ मार्च रोजी नाशिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्यानंतर तपासाचे चक्र वेगाने फिरले असून, आतापर्यंत त्याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिकमधील सरकारवाडा, मुंबई नाका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, राहता येथील गुन्ह्यांचा समावेश आहे. तपासातील धक्कादायक बाबी रिमोट कंट्रोल नाग : भक्तांना घाबरवण्यासाठी २० फुटांचा नाग रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने फिरवत असे.
कस्तुरीचा वापर : फसवणुकीसाठी तो दुर्मिळ जडीबुटी आणि हरिणाची कस्तुरी वापरून चमत्कारचा बनाव.
राजकीय कनेक्शन : खरातच्या आश्रमात अनेक बड्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची उठबस असल्याचे फोटो समोर.
पत्नीचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू.
एसआयटी-आता या प्रकरणाचा मुळापासून तपास करत असून खरातच्या मालमत्तेचा आकडा ५०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता.
