RCB Ticket Scam | RCB च्या सामन्यात लाखो रुपयांचा गंडा! कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने असा लावला चुना

0
RCB.webp.webp


RCB Ticket Scam | आयपीएल 2026 दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघाच्या सामन्यांशी संबंधित मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. संघाची कामगिरी चांगली असताना चाहत्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून स्टेडियममधील कँटीनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीवर तिकिटांच्या काळाबाजाराचा गंभीर आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिन्नास्वामी स्टेडियम (Chinnaswamy Stadium) परिसरात काम करणाऱ्या चंद्रशेखर (Chandrashekhar) नावाच्या व्यक्तीने सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून सुमारे 180 तिकिटांची अवैध विक्री झाल्याची माहिती मिळाली आहे. ही तिकिटे तो 15 हजार ते 19 हजार रुपयांदरम्यान विकत होता. (RCB Ticket Scam )

या प्रकरणात त्याला केंद्रीय गुन्हे शाखेने (Central Crime Branch) रंगेहाथ पकडून अटक केली आहे. आरोपी तिकिटे विविध मार्गांनी मिळवून ती जास्त दराने विकत होता. विशेष म्हणजे, त्याने मोबाईलच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत व्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे.

RCB Ticket Scam | लाखोंची कमाई, आणखी जण संशयित:

तपासात उघड झाल्यानुसार, आरोपीने या काळाबाजारातून 25 लाख रुपयांहून अधिक रक्कम कमावली आहे. त्याने 28 मार्च रोजी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) तसेच लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्याविरुद्धच्या सामन्यांची तिकिटे विकली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीकडे विविध श्रेणीतील तिकिटे होती आणि त्याच्यासोबत आणखी काही लोक या रॅकेटमध्ये सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरसीबीचा मोठा चाहता वर्ग असल्यामुळे सामन्यांना मोठी गर्दी होत असते. तिकिटांची कमतरता आणि वाढलेली मागणी याचा फायदा घेत हा गैरप्रकार करण्यात आला. या घटनेमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

News title : RCB Ticket Black Market Scam Exposed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *