EPFO News | नोकरदारांनो EPFO चा ‘हा’ मोठा नियम नक्की वाचा!

0
EPFO-.webp.webp


EPFO News | कर्मचारी भविष्य निधी खातेदारांसाठी मोठी सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ईपीएफओच्या नव्या डिजिटल प्रणालीमुळे पीएफची रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. कागदपत्रांची कटकट कमी करून सदस्यांना यूपीआय आणि एटीएमच्या माध्यमातून थेट निधी मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम सुरू आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) सध्या EPFO 3.0 या महत्त्वाकांक्षी डिजिटल प्रकल्पावर काम करत आहे. या नव्या व्यवस्थेमुळे सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी पारंपरिक प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागणार नाही. प्रणालीचा मुख्य उद्देश दावे निकाली काढण्यास होणारा विलंब कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ बनवणे हा आहे.

केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी या सुविधेची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. नव्या व्यवस्थेनुसार सदस्यांना यूपीआय (UPI) किंवा यूपीआय-सक्षम एटीएमद्वारे त्यांच्या खात्यातील उपलब्ध पीएफ रक्कम पाहता येईल. पात्र रक्कम थेट आधारशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. व्यवहार पूर्ण करण्यासाठी यूपीआय पिनचा वापर करावा लागेल. एकदा रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर ती ऑनलाइन व्यवहारांसाठी किंवा एटीएममधून रोख स्वरूपात काढण्यासाठी वापरता येईल.

EPFO News | किती रक्कम काढता येणार? :

नव्या नियमांनुसार सदस्यांना त्यांच्या एकूण पीएफ निधीपैकी 50 टक्क्यांपासून 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी मिळू शकते. मात्र खात्यात किमान 25 टक्के निधी कायम ठेवणे आवश्यक असेल. त्यामुळे संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढता येणार नाही. ही प्रक्रिया ठराविक पात्रता आणि अटींवर आधारित असेल.

यासोबतच ईपीएफओने ऑटो-सेटलमेंटची मर्यादा वाढवून 5 लाख रुपये केली आहे. पूर्वी ही मर्यादा कमी होती. त्यामुळे घर बांधकाम, घर खरेदी, शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा विवाह यांसारख्या गरजांसाठी निधी मिळवणे अधिक सोपे होणार आहे. अनेक दावे आता तीन दिवसांच्या आत निकाली निघू शकतील. तसेच या नव्या प्रणालीत सदस्यांना उमंग ॲप (UMANG App) च्या मदतीने फेस ऑथेंटिकेशनद्वारे यूएएन (UAN) सक्रिय करणे, पासबुक पाहणे, वैयक्तिक माहिती दुरुस्त करणे, ऑनलाइन दावे सादर करणे आणि आधार लिंकिंगशी संबंधित सुधारणा करणे शक्य होणार आहे.

विशेष म्हणजे एटीएममधून पीएफ रक्कम काढण्याच्या सुविधेचा कर्मचारी पेन्शन निधीवर कोणताही परिणाम होणार नाही. ही सुविधा केवळ ईपीएफ शिल्लक रकमेपुरती मर्यादित असेल.

News Title: EPFO 3.0 PF Withdrawal Rules

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *