महाराष्ट्राच्या फाळणीची ही तर मुहूर्तमेढ नाही ना?:विधानसभेच्या 400 जागांच्या नियोजनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

0
730-x-548-2025-06-24t10203267317507405921753851943_1776228548.jpg




महाराष्ट्रात लोकसभेच्या 72 जागा होत आहेत, पण मला वाटते जास्त जागा व्हायला हव्यात. विधानसभेच्या 400 जागा तयार होणार आहेत, त्यासाठी विधान भवन बांधण्यात आलेले नाही. 400 जागा झाल्यावर त्या जागेंच्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे तुकडे या लोकांनी केले ही त्यांची तयारी आहे का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, 400 विधानसभा सदस्यांना मुंबईच्या विधान भवनात बसू शकत नाही. त्यांना बसण्यासाठी तिथे जागा नाही. मग आम्ही विदर्भातले नागपुरात बसतो, तुम्ही मुंबईत बसा अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या फाळणीची मुहूर्तमेढ तर रोवली जाणार नाही ना? अशी भीती जनतेच्या मनात आहे. मतदारसंघाची पुनर्रचना ज्या पद्धतीने समोर आली आहे, ती संपूर्ण देशात गंभीर समस्या निर्माण करू शकते. हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारने अत्यंत चुकीची वेळी निवडली आहे. 5 राज्यात निवडणूक सुरू आहे. त्या राज्याचे खासदार प्रचारात अडकले आहेत. ते मतदानासाठी दिल्लीत पोहोचतील का नाही, अशी शंका सर्वांना आहे. त्यांना तिथे व्यस्त ठेवत दिल्लीत मतदान घ्यायचे असे सरकारचे ठरले आहे का? कारण संख्याबळ सरकारकडे नाही. ..तर स्वागत करू संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतले जातात. उद्धव ठाकरे हे सुद्धा पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. आपल्या माध्यमातून जर कार्याध्यक्ष पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव समोर येत असेल तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. अजून असे काही घडलेले नाही, माध्यमांमध्ये दिसणाऱ्या माहितीवर मी हे उत्तर दिले आहे. मीडीयातील माहिती आणि माध्यमांच्या प्रश्नांवर मी हे बोलतो आहे. तरुणांच्या हाती नेतृत्व देतांना पुढचे राजकारण तरुणांवरच आहे, याचा विचार केला पाहिजे. आदित्य ठाकरेंचे कार्य चांगले संजय राऊत म्हणाले की, मुंबई मनपाच्या आणि इतर मनपाच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उत्तम काम केले आह. त्यांची जी तरुणांची टीम आहे त्यांनी चांगले काम केले आहे. विधान परिषदेच्या जागेसंदर्भात दिल्लीत का चर्चा व्हावी? विधान परिषदेत कोण जाणार यासाठी बराच वेळ आहे. महिला आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्टच संजय राऊत म्हणाले की, महिला आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. महिलांच्या राजकीय हितांच्या आड शिवसेना कधीही आलेली नाही. येणार सुद्धा नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिले महिलांना राजकीय आरक्षण देण्यात आले आहे. आपल्याकडे महात्मा फुलेंचा वारसा आहे, आपण महिलांसाठी नेहमीच कार्य करत आलेलो आहोत. देशातील सर्व पक्षीय महिलांना हे विधेयक आपले वाटत असेल तर शिवसेनेने किंवा कोणी विरोध केलेला नाही. पण जनगणनेची सुरूवात न करता, मतदारसंघ न ठरवता हे सर्व सुरू आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks