अस्सल पैठणी ओळखण्यासाठी आता येणार बारकोड!:ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र

[ads1]


पैठणी म्हणजे महिलांचे सौंदर्य खुलवणारा आणि सण-समारंभांमध्ये विशेष क्रेझ असलेला पारंपरिक वस्त्रअलंकार आहे. अलीकडे ‘ओरिजनल’ पैठणीच्या नावाखाली ‘सेमी’ आणि ‘डुप्लिकेट’ पैठणी बाजारात विकून ग्राहकांची मोठी फसवणूक केली जाते. ग्राहकांची ही फसवणूक टाळण्यासाठी आणि खऱ्या-खोट्यातील फरक स्पष्ट करण्यासाठी राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने आता एक नवी शक्कल लढवली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पंढरपूर दौऱ्यावर असताना विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर माध्यमांना या नव्या उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी आमदार समाधान आवताडे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. खऱ्या पैठणीची ओळख पटावी यासाठी आता पैठणीवर एक विशेष बारकोड आणि लोगो लावण्याचा प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सुरू आहे. या बारकोडच्या माध्यमातून पैठणीसाठी कोणता धागा वापरला आहे, ती कोणत्या गावात आणि कोणत्या कारागिराने तयार केली आहे, याची संपूर्ण माहिती ग्राहकांना उपलब्ध होणार असून बनावट पैठणी सहज ओळखता येणार आहे. पैठणीचे सांस्कृतिक महत्त्व व उत्पादन पैठणीच्या निर्मिती आणि कुशल कारागिरांबाबत बोलताना मंत्री संजय सावकारे यांनी स्पष्ट केले, “पैठणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे पैठणीला मागणी खूप आहे, तो एक कलेचा भाग आहे, एक पैठणी तयार करायला 20 ते 30 दिवस एवढा कालावधी कारागिरांना लागतो. पैठणीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुद्धा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.” विक्रीसाठी प्रदर्शनांचे आयोजन शासनाच्या माध्यमातून पैठणीला मिळणाऱ्या बाजारपेठेविषयी माहिती देताना संजय सावकारे म्हणाले, “पैठणी विक्रीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रदर्शन भरवत असतो, त्यामधून सुद्धा पैठणी खरेदीसाठी चांगली मागणी मिळत असल्याचे सावकारे यांनी सांगितले.”

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *