संत एकनाथ महाराजांच्या पावन नगरीतील प्रसिद्ध नाथ मंदिरामागील मोक्ष घाटावरील स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी शुक्रवारी घाटाची पाहणी करून परिसरातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. घाटावर अस्वच्छता पसरू नये तसेच धार्मिक विधींसाठी येणाऱ्या नागरिकांची व भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या कडक सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या. नाथ मंदिर परिसराला खूप मोठे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असल्याने येथे विविध धार्मिक विधींसाठी संपूर्ण मराठवाड्यातून नागरिकांची नियमित मोठी वर्दळ असते. त्यामुळे मोक्ष घाट परिसर अत्यंत स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर आहे. या अनुषंगाने मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी घाटावरील स्वच्छता, परिसराची देखभाल आणि नागरिकांना लागणाऱ्या आवश्यक सुविधांची पाहणी केली. परिसरात नियमित स्वच्छता राखण्यासह नागरिकांच्या अडचणी वेळेत दूर करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. मोक्ष घाट परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांनी दिले. या पाहणी प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड व स्वच्छता निरीक्षक अश्विन गोजरे यांची उपस्थिती होती. दरम्यान, मोक्ष घाटावर धार्मिक विधीसाठी नागरिकांची मोठ्या संख्येने ये-जा असते. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा द्याव्यात, अशा सूचनाही डॉ. अंभोरे यांनी यावेळी केल्या. मोक्ष घाट परिसरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, मुख्याधिकारी डॉ. अंभोरे यांनी पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मोक्ष घाटाची मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी पाहणी केली. नगराध्यक्षांकडून समस्यांच्या निराकरणाचे निर्देश दुसरीकडे, नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांनीही मोक्ष घाटावरील समस्या आणि अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता आणि आवश्यक सुविधांची उपलब्धता राखणे अत्यंत गरजेचे असल्याने घाटाच्या देखभालीकडे सातत्याने नियमित लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
उपाययोजनांच्या सूचना:पैठणच्या नाथ मंदिरामागील मोक्ष घाटाची पाहणी