छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान:भांडेगाव येथे लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप, महसूल अधिकाऱ्यांची उपस्थिती

0
whatsapp-image-2026-04-13-at-53041-pm_1776081750.jpeg




हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सोमवारी ता. १३ गावकऱ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करून इतर प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात आली आहे. भांडेगाव येथे आयोजित कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, नरेंद्र इंगळे, मंडळ अधिकारी शिल्पा चाटसे, पोलिस पाटील ज्ञानेश्‍वर जाधव, खांबाळा पोलिस पाटील सुरेश पुरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अलोक गट्टु, मुख्याध्यापक वानखेडे, माजी जि.प.सदस्य माधव कोरडे, भुमि अभिलेख उप अधिक्षक प्रमोद माळे आदी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी बोधवड, उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी मार्गदर्शन केले. या अभियानामध्ये मंडळस्तरावर शिबीर आयोजित करून नागरीकांचे प्रश्‍न सोडविले जात आहेत. शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांची सोडवणुक केली जात असून त्यांच्या तक्रारी, अडचणी एेकून घेत त्या मार्गी लावल्या जात आहे. या अभियानाच्या माध्मयातून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याचेे प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना द्वारपोच सेवा पुरविल्या जात असून सातबारा मोहिमे अंतर्गत वारसा नोंदी, फेरफार घेऊन त्याला मंजुरी दिली जात आहे. हिंगोली तालुक्यातील मंडळांमधून आयोजित या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी गावकऱ्यांना प्रमाणपत्रांचे तसेच मालकी हक्काच्ाय सनदचे वाटप करण्यात आले. शिबारीसाठी ग्राम महसुल अधिकारी अनिल काळे, तलाठी विनोद ठाकरे, दिनकर धरणे, ग्रा.म.अ.वैभव सोसे, कुलकर्णी, वाठोरे, नारायण जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks