CSK vs KKR | चेन्नई-कोलकाता भिडणार! IPL 2026 मध्ये रंगणार अस्तित्वाची लढाई; कोण बाजी मारणार?

0
CSK-vs-KKR.webp.webp


CSK vs KKR | IPL 2026 मधील 22वा सामना अत्यंत रोमांचक ठरणार आहे. Chennai Super Kings आणि Kolkata Knight Riders यांच्यात होणाऱ्या या लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. कारण दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली असून, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना ‘करो या मरो’ ठरणार आहे.

चेन्नईने 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे, तर कोलकात्याला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघासाठी पुढचा मार्ग थोडा सोपा होणार आहे.

आयपीएल इतिहासात Chennai Super Kings आणि Kolkata Knight Riders यांच्यात आतापर्यंत 32 सामने झाले आहेत. त्यापैकी चेन्नईने 20 सामने जिंकले, तर कोलकात्याने 11 वेळा विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला.

दोन्ही संघांनी मिळून 8 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. चेन्नई (5) आणि कोलकाता (3). त्यामुळे हा सामना प्रतिष्ठेचा देखील मानला जात आहे.

CSK vs KKR | चेपॉक पिच रिपोर्ट काय सांगतो? :

हा सामना चेन्नईच्या होमग्राउंडवर म्हणजे M. A. Chidambaram Stadium (चेपॉक) येथे खेळवला जाणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते आणि मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असते. (CSK vs KKR News)

यंदाच्या हंगामात येथे खेळलेल्या सामन्यांमध्ये 200+ धावा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

कोण मारणार बाजी? :

Chennai Super Kings ने मागील सामन्यात विजय मिळवत आत्मविश्वास परत मिळवला आहे, तर Kolkata Knight Riders अजूनही पहिल्या विजयासाठी झगडत आहे.

दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून, जो संघ दबाव चांगल्या प्रकारे हाताळेल तोच विजयाचा दावेदार ठरेल.

News Title: CSK vs KKR IPL 2026 Match Preview: Crucial Clash for Survival at Chepauk

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks