नांदेड (प्रतिनिधी) – शहरात तलवारीचा धाक दाखवून मारहाण करण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, रामनगर ते ताजनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणावर तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास रामनगर ते ताजनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. आरोपी क्रमांक एक कळठेकर (पूर्ण नाव माहीत नाही) आणि प्रमोद (पूर्ण नाव माहीत नाही), दोघेही रा. शिवनगर, नांदेड यांनी संगनमत करून अज्ञात कारणावरून मोहम्मद जुलफेकार मोहम्मद इब्राहिम (वय ४१, रा. ताजनगर, नांदेड) यांच्यावर तलवारीने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी जखमी मोहम्मद जुलफेकार मोहम्मद इब्राहिम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १०९(१), ११८(१), ११५(२), १२६, ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साखरे करीत आहेत. तलवारीने झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation चाकूरमध्ये ११.७० लाखांचे ५४० किलो चंदन जप्त; डीआयजी पथकाची धडक कारवाई