हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान धावणाऱ्या पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेला (पिंक लाइन) पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी (ता. ४) पहाटे सहा वाजता मान आणि जिल्हा न्यायालय या दोन्ही स्थानकांवरून एकाच वेळी मेट्रोची प्रवासी सेवा . मेट्रोच्या पहिल्या फेऱ्या स्थानकांवर पोहोचल्यानंतर प्रवाशांवर आणि मेट्रोवर पुष्पवृष्टी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पीआयटीसीएमआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी, मुख्य वित्त अधिकारी मितुल झवेरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी विविध स्थानकांवर उपस्थित होते. त्यांनी पहिल्या प्रवाशांचे स्वागत केले. मेट्रो कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या या स्वागताबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि शिवाजीनगर यांना जोडणारा हा २३.२०३ किलोमीटरचा उन्नत मार्ग पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज ये-जा करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना या मार्गिकेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. प्रमुख रोजगार आणि व्यावसायिक केंद्रांमधील संपर्क वाढल्याने प्रवासाचा वेळ आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी म्हणाले, पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेची प्रवासी सेवा सुरू होणे हा शहरासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी दाखवलेला उत्साह आनंददायी आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी या मार्गिकेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित होते. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित झालेला हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे. डिझाइन, बांधकाम, वित्तपुरवठा, संचालन आणि हस्तांतरण (डीबीएफओटी) पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 6 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लावणी कलाकारांचा पुढाकार:मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखांची मदत कोल्हापुरातील रास्ता रोकोमुळे प्रवाशांची गैरसोय:राजू शेट्टींनी मागितली माफी, म्हणाले, आमचा नाईलाज झाला