महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विविध समाज प्रबोधनपर उपक्रम:ठिकठिकाणी विविध कार्यक्रम; शाळा महाविद्यालयात जयंती साजरी
![]()
समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, ११ एप्रिल रोजी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यक्रमातून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या फुल
.
श्री गणेश कला महाविद्यालयात महात्मा फुलेंना अभिवादन
अकोला | स्थानिक कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयात नुकतीच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. व्हि. मेहरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहसंचालक कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, अमरावतीचे प्रशासकीय अधिकारी राम राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणातून प्रा. मेघराज गाडगे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर सखोल प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना राम राठोड यांनी मानवाच्या कल्याणाकरिता ज्या थोर हुतात्म्यांनी आपल्या जीवनाचे बलिदान देऊन आपले प्रखर विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले त्यात महात्मा फुलेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल आणि त्यांच्या कार्यापासून आपल्याला प्रेरणा घेऊन जीवन घडवावे लागेल. तसेच आधुनिक काळात नवीन आव्हानांना स्वीकारून आपल्यामध्ये कौशल्य निर्माण करून आपले जीवन सुकर केले पाहिजे, असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. के. व्ही. मेहरे यांनी महात्मा फुलेंच्या विचारांना विनम्र अभिवादन करत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत विभागाचे प्रा. डॉ. सुधाकर मनवर यांनी तर आभार प्रदर्शन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. यु.जामनिक यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
