अकोला जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांत घबराट:यापूर्वी 2021,2020, मार्च 2024 मध्ये जाणवला हाेता धक्का; सुदैवाने जिवित हानी टळ
.

मराठवाड्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने अकोल्यातही ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.५० च्या सुमारास काही भागात अतिसौम्य धक्के काहींना जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ एवढी नोंदवण्यात आली आहे. याचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील उत्तरेला होता ,असे जिल्हा प्रशासाकडून सांगण्यात आले आहे.यापूर्वी नांदेड, हिंगोली, परभणीचा काही भाग सौम्य भूकंपाने हादरला होता. सहा ठिकाणी ५ धक्के बसले होते. अशातच शनिवारी ८ वाजून ४७ मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली. नांदेड, परभणीच्या काही भागात कंपणे जाणवली. हा भूकंप १९.५३३ अक्षांश व ७७.२०२ रेखांश दरम्यान जाणवला. दिवसेंदिवस नैसर्गिक रचनेत मानवचा अतिरेकी हस्तक्षेप वाढतच आहे. भूगर्भात अंतर्गत हालचालींमुळे लिथोस्पेअर शिलावरणाच्या प्लेट्स जागा बदलतात. शनिवारी सकाळीही अकोला जिल्ह्यातील गायगाव, चांदूर, तेल्हारा भागात काही क्षण अतिसौम्य धक्के जाणवल्याची माहिती मला मिळाली. तीव्र ३ पेक्षा कमी रिश्टर स्केलवर नोंद असल्यास धक्के जाणवत नाहीत. {जिल्ह्यात यापूर्वी २३ जून २०२० रोजी ३.३ रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. {बाळापूर तालुक्यात १७ एप्रिल २०२१ रोजी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्का जाणवला होता. रिश्टर स्केलवर ३.० इतक्या तीव्रतेची नोंद करण्यात आली होती. {बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर परिसरात २६ मार्च २०२४ रोजी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर २. ९ इतक्या तीव्रतेची नोंद करण्यात आली होती. {अकोट व तेल्हारा तालुक्यातील काही भागात सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. { शनिवार, ११ एप्रिल रोजी िहंगोली जिल्ह्यातील भूकंपामुळे अकोल्यात अतिसौम्य धक्के जाणवले. प्रभाकर दोड, खगोल तज्ज्ञ, विश्वभारती केंद्र प्रमुख.
नैसर्गिक रचनेत मानवचा अतिरेक
गत सहा वर्षात असे जाणवले धक्के
