शरद पवार गटाचा भाजप, RSS वर तिखट पलटवार:आचार्य तुषार भोसले हा भाजप, संघाने वारकरी संप्रदायात सोडलेला ढोंगी वारकरी
![]()
शरद पवारांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांच्या घुसखोरी झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरकसपणे पलटवार करत भाजप व संघाने तुषार भोसले नामक ढोंगी वारकरी, वारकरी संप्रदायात सोडला असल्याचा आरोप केला आहे. शरद पवारांनी शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित झालेल्या एका स्मरणिकेत एक लेख लिहिला आहे. त्यात वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांनी घुसखोरी केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या भूमिकेवर भाजप नेते आचार्य तुषार भोसले यांनी जोरदार टीका केली. हिंदू धर्म व वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे. त्यांना जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्ट्या झोडताना ते लोक धर्मांद वाटत नाहीत, असे ते म्हणाले होते. तुषार भोसले ढोंगी वारकरी तुषार भोसले यांच्या या टीकेचा शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, शरद पवारांनी वारकरी संप्रदायात 60% प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी बाबत केलेले विधान अतिशय वास्तववादी आहे. त्यामुळे मनुवादी विचाराचे वैदिक परंपरेतील सनातनी लोक खवळून उठणे स्वाभाविक आहे कारण ते प्रतीक आम्ही विचाराचे आहेत. म्हणूनच तुषार भोसले नावाचा ढोंगी वारकरी RSS भाजपाने वारकरी संप्रदायात सोडलेला आहे. वारकरी संप्रदायाचे वैद्यकीय करण करणे यासाठीच प्रतिगामी विचाराचे लोक घुसलेले आहेत. आम्ही वारकरी संतांचा विचार रुजवण्यासाठी व पुढे घेऊन जाण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहू प्रतिगामी विचारांच्या लोकांचे प्रयत्न हाणून पाडू. आचार्य भोसले वारकरी संप्रदायामध्ये जाती वर्ण किंवा धर्मावर आधारित कोणताही भेदभाव चालणार नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम अमंगळ !! हे तुकोबांचे वचन तुम्हाला अडचणीचे आहेत. भाजप व देवेंद्र फडणवीस तुमच्या भोंदू वारकरी असलेल्या तुषार भोसलेला आवरा आणि वारकरी सांप्रदाय नासवू नका, असे लवांडे यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू नेमके काय म्हणाले होते शरद पवार? शरद पवार आपल्या लेखात म्हणाले होते, वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीत आता प्रतिगामी विचारसरणीचे लोक घुसखोरी करत आहेत. वारकरी संप्रदायात 60 टक्के लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात. त्यामुळे आम्ही आता यादी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या साधारण चाळीसएक लोक असे दिसतात की, ते वारकरी संप्रदायात कीर्तन व प्रवचनातून पुरोगाी भूमिका मांडतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाहीत. माझ्यावर काही व्यक्तींचा अत्यंत प्रभाव आहे. त्यातील एक म्हणजे माझी आई. त्याकाळी जिल्हा लोक बोर्डात महिला प्रतिनिधीसाठी एक जागा असायची. त्या जागेवरून संपूर्ण जिल्ह्यातून माझी आई निवडून आली होती. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती एकही बैठक चुकवायची नाही. अभ्यास करून जायची. त्याकाळी प्रवासाची साधने नसायची. खासगी मोटार सर्व्हिस होती. एसटी नसायची, असे शरद पवार म्हणाले होते.
