OTT Weekend Watch | वीकेंडला ओटीटीवर सस्पेन्स थ्रिलरची मेजवाणी; पाहा ‘या’ मूव्ही-सीरीज
OTT Weekend Watch | या आठवड्याच्या शेवटी मनोरंजनप्रेमींसाठी मोठी मेजवानी सजली आहे. थिएटरमध्ये काही दमदार चित्रपट प्रदर्शित होत असतानाच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अॅक्शन, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या नव्या चित्रपट आणि मालिकांचा वर्षाव झाला आहे. त्यामुळे घरबसल्या दर्जेदार कंटेंट पाहण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
चित्रपटांसह OTT वर नवे पर्याय
‘धुरंधर २’ (Dhurandhar 2) आधीच सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यासोबतच १० एप्रिल रोजी आदिवी शेष (Adivi Sesh) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा ‘डकैत’ (Dacoit) हा चित्रपटही थिएटरमध्ये दाखल झाला आहे. मात्र, घरबसल्या मनोरंजन पसंत करणाऱ्यांसाठी ओटीटीवरही आकर्षक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि तृप्ती डिमरी (Triptii Dimri) यांची मुख्य भूमिका असलेला ‘ओ रोमियो’ (O Romeo) हा चित्रपट थिएटरनंतर आता प्राईम व्हिडिओ (Prime Video) वर १० एप्रिलपासून स्ट्रीम होत आहे. विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) दिग्दर्शित या रिव्हेंज ड्रामामध्ये नाना पाटेकर (Nana Patekar), अविनाश तिवारी (Avinash Tiwary), दिशा पटानी (Disha Patani), रणदीप हुडा (Randeep Hooda), फरिदा जलाल (Farida Jalal) आणि विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) यांसारखे कलाकारही दिसतात.
‘तू या मैं’ (Tu Ya Main) हा बेजॉय नंबियार (Bejoy Nambiar) दिग्दर्शित सर्व्हायव्हल थ्रिलर १० एप्रिलपासून नेटफ्लिक्स (Netflix) वर उपलब्ध झाला आहे. यात शनाया कपूर (Shanaya Kapoor) आणि आदर्श गौरव (Adarsh Gourav) प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट ‘द पूल’ या थाई चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. त्याचप्रमाणे ‘थाई किझवी’ (Thai Kizhi) हा तमिळ चित्रपट जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) वर प्रदर्शित झाला असून, राधिका सरथकुमार (Radhika Sarathkumar) यांनी ७० वर्षीय सावकाराची भूमिका साकारली आहे.
वेब सिरीज आणि थ्रिलरची मेजवानी
थरारपटांची आवड असणाऱ्यांसाठी ‘थ्रॅश’ (Thrash) हा शार्क हल्ल्यावर आधारित चित्रपट १० एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या संकटात जीव वाचवण्याची झुंज दाखवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
सायन्स फिक्शन चाहत्यांसाठी ‘स्टार वॉर्स – मॉल – शॅडो लॉर्ड’ (Star Wars – Maul – Shadow Lord) ही मालिका ६ एप्रिल २०२६ पासून जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे. डेव्ह फिलोनी (Dave Filoni) निर्मित या मालिकेत एकूण १० भाग आहेत. याशिवाय ‘द बॉईज’ (The Boys) चा पाचवा सीझन ८ एप्रिलपासून प्राईम व्हिडिओवर सुरू झाला असून, होमलँडर (Homelander) आणि बुचर (Butcher) यांच्यातील अंतिम संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
‘बिग मिस्टेक्स’ (Big Mistakes) हा डॅन लेव्ही (Dan Levy) दिग्दर्शित शो ९ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे, ज्यात कॉमेडी आणि थ्रिलरचा संगम आहे. तर ‘युफोरिया’ (Euphoria) सीझन ३ ही लोकप्रिय मालिका १२ एप्रिलपासून एचबीओ मॅक्स (HBO Max) वर पाहायला मिळणार आहे. झेंडाया (Zendaya) सोबत एरिक डेन (Eric Dane), त्रिशा पायटस (Trisha Paytas), जेकब एलोर्डी (Jacob Elordi), नताशा लायोन (Natasha Lyonne), एली रॉथ (Eli Roth) आणि क्वामे पॅटरसन (Kwame Patterson) यांचीही प्रमुख भूमिका आहे.
