Cockroach Removal Tips | घरामधील झुरळांच्या त्रासाने हैराण झालात? तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा
Cockroach Removal Tips | किचनमध्ये झुरळे दिसू लागली की ती केवळ त्रासदायक नसून आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतात. अन्नपदार्थांवर बसणारी ही कीटक फूड पॉइझनिंग, टायफॉइड आणि ॲलर्जी यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे वेळेतच त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. चांगली गोष्ट म्हणजे यासाठी महागडी केमिकल औषधे वापरण्याची गरज नाही. घरात उपलब्ध साध्या गोष्टींनीही झुरळांना दूर ठेवता येते.
सर्वात सोपा उपाय म्हणजे लवंग. किचनमधील कपाटांमध्ये किंवा कोपऱ्यांमध्ये 8–10 लवंगा ठेवल्यास त्याच्या तीव्र वासामुळे झुरळे दूर पळतात. त्याचप्रमाणे बेकिंग सोडा आणि साखर एकत्र करून कोपऱ्यांमध्ये टाकल्यास झुरळे त्याकडे आकर्षित होतात आणि नष्ट होतात. (Cockroach Removal Tips News)
तमालपत्र आणि दालचिनी यांसारख्या मसाल्यांचा सुगंधही झुरळांना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे या गोष्टी कुस्करून किचनमध्ये ठेवल्यास झुरळांचा वावर कमी होतो. कडुनिंबाचे तेल किंवा पावडरही नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते, त्याचा स्प्रे केल्यास झुरळे दूर राहतात.
Cockroach Removal Tips | स्वच्छता आणि घरगुती उपाय ठरतात सर्वात प्रभावी :
किचन स्वच्छ ठेवणे हा झुरळांपासून बचाव करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. पांढरा व्हिनेगर आणि पाणी मिसळून रोज रात्री सिंक आणि प्लॅटफॉर्म साफ केल्यास झुरळे येण्याची शक्यता कमी होते.
याशिवाय काकडीच्या सालींचा प्रयोगही उपयुक्त ठरतो. ॲल्युमिनियमसोबत त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन तयार होणारा वास झुरळांसाठी घातक ठरतो. तसेच लिंबाच्या रसाने पोछा मारल्यास किचन स्वच्छ राहते आणि सिट्रस वासामुळे झुरळे दूर राहतात. (Cockroach Removal Tips)
पुदिन्याच्या तेलाचा स्प्रे हा आणखी एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. त्याचा सुगंध झुरळांना नकोसा वाटतो आणि ते त्या भागापासून दूर राहतात.
एकूणच, नियमित स्वच्छता आणि हे सोपे घरगुती उपाय वापरल्यास किचनमधील झुरळांचा कायमचा बंदोबस्त करता येऊ शकतो, तेही कोणत्याही महागड्या केमिकलशिवाय.
