‘रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नये’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या विधानाचा समाचार घेत, शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात प्रस्तावित असलेल्या ‘नायगाव जलविद्युत प्रकल्पा’साठी तब्बल १ लाखांहून अधिक झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप करत, हा ‘फडतूसपणा’ सहन केला जाणार नाही, असा थेट इशारा दानवे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर पत्र लिहून हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या प्रकल्पातील पर्यावरणीय धोके आणि प्रशासकीय विरोधाभास उघड केला आहे. ‘ऑक्सिजन देण्यात झाडे भेदभाव करत नाहीत, मग तुम्ही का करता?’ आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधताना दानवे म्हणाले, “‘रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नये’ हे वाक्य झाडांच्या सामूहिक कत्तलीचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीच्या मुखी शोभत नाही. झाड अभयारण्यातील असो किंवा अन्य वनक्षेत्रातील, ऑक्सिजन देण्यात ते कधीही भेदभाव करत नाही, मग तोडताना तुम्ही का फरक करता?”सध्या हवामान बदलाच्या आणि पर्यावरणीय संकटाच्या काळात निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे वनविभागाच्या मूळ ‘नॉट रिकमेंडेड’ अभिप्रायाचा आणि पर्यावरणप्रेमींच्या भावनांचा आदर करत हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. —————– हेही वाचा.. विरोधकांना मुद्दे मिळत नाहीत, म्हणून ते मला टार्गेट करतात: अमृता फडणवीसांचा विरोधकांना टोला; राज ठाकरेंच्या विधानावरही स्पष्ट केले मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून सातत्याने टार्गेट केले जात असल्याच्या प्रश्नावर, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे. “देवेंद्रजींवर टीका करण्यासाठी जेव्हा विरोधकांना काही मुद्दे मिळत नाहीत, तेव्हा त्यांना त्यांची बायको भेटते,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. प्रभात प्रतिष्ठान आणि किशोरजी यांच्या पुढाकाराने आयोजित एका भाऊबीजेच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी मदत, राज ठाकरेंचे मिश्किल विधान आणि महिला मुख्यमंत्री यासारख्या अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर मनमोकळी उत्तरे दिली. सविस्तर वाचा What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 11 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation शालार्थ आयडी घोटाळा:2012 ते 2016 दरम्यान दीड हजारबोगस आयडीद्वारे 100 काेटींचा अपहार, एसआयटीच्या तपासात बाब उघड मुंढेंचा धडाका अन् थेट मंत्र्यांचाच ब्रेक:रांजणगावच्या मिथेनॉल कंपनीवरील कारवाई झिरवाळांकडून स्थगित, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दबाव असल्याचा आरोप