Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! अदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा

0
Aditi-Tatkare-Raigad-guardian-minister-post-cancelled.webp.webp


Ladki Bahin Yojana | राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला असून आता ही मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिलांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी ही माहिती दिली असून, ज्यांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी या अतिरिक्त कालावधीत ती पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. (Ladki Bahin Scheme Maharashtra)

लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन 31 डिसेंबर आणि नंतर 31 मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली. आता पुन्हा एकदा शासनाने 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. (eKYC deadline extension)

दरम्यान, केवायसी पोर्टल वारंवार बंद पडणे, तांत्रिक अडचणी येणे तसेच प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले जाणे अशा कारणांमुळे अनेक लाभार्थींना वेळेत ई-केवायसी करता आली नव्हती. महिलांकडून आलेल्या तक्रारी आणि सूचना लक्षात घेऊनच ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Ladki Bahin Yojana | महिलांच्या खात्यात दरमहा जमा होतात 1500 रुपये :

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. राज्यातील अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.

या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान महिलांना मिळणाऱ्या सन्मान निधीत वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सरकार सत्तेत आल्यानंतरही त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे सन्मान निधी वाढवण्याबाबत सरकार कधी घोषणा करणार, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे.

News Title: Ladki Bahin Yojana Update: E-KYC Deadline Extended Till 30 April, Big Announcement by Aditi Tatkare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed