अमरावतीतील मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत जनजागृतीपर व्याख्यान झाले. यावेळी सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी नशामुक्तीचा संकल्प केला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयाने ही विशेष मोहीम राबवली. शिवाजीनगरमधील महाविद्यालयाच्या सभागृहात व्याख्यान आणि शपथग्रहणाचा कार्यक्रम झाला. अंमली पदार्थांच्या सेवनाचे तसेच व्यसनांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्यशील कांबळे होते. प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख प्रमुख अतिथी, तर डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत प्रमुख व्याख्याते होते. बार्टीच्या प्रकल्प संचालक अनिता गवई आणि समाज कल्याण निरीक्षक रवींद्र महालकर उपस्थित होते. डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम सांगितले. व्यसनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, वाईट सवयींपासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी आणि व्यसनमुक्त जीवनशैली कशी स्वीकारावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य स्मिता देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे आणि मित्रपरिवारासह समाजात व्यसनमुक्तीचा संदेश द्यावा, असे आवाहन केले. रवींद्र महालकर यांनी व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यात युवकांची भूमिका सांगितली. सत्यशील कांबळे यांनी व्यसनाधीनतेचा आरोग्य, कुटुंब आणि सामाजिक जीवनावर होणारा परिणाम सांगितला. स्वतः व्यसनांपासून दूर राहण्यासोबत इतरांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले. अनिता गवई यांनी ‘नशामुक्त भारत, नशामुक्त शहर आणि नशामुक्त परिवार’ या संकल्पनेतून व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व सांगितले. नशामुक्त समाजासाठी प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून जनजागृतीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भारताला नशामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची सामूहिक शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्यासोबत इतरांनाही व्यसनांपासून परावृत्त करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला वरिष्ठ लिपिक अंकुश सूर्यवंशी, समतादूत पूजा गौतम आणि भावना वासनिक यांच्यासह विद्यार्थी व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. अनिता गवई यांनी आभार मानले. नशामुक्त भारत अभियानाचा संदेश युवकांपर्यंत पोहोचवत कार्यक्रमाची सांगता झाली. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation कमी पाण्यात भरघोस उत्पन्न:यावलच्या प्रगतिशील शेतकऱ्याची 'भरिताच्या वांग्या'तून यशोगाथा; 65 गुंठ्यात साडेपाच लाखांचे उत्पन्न