जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या दहा जागांसाठी सोमवारी ( २ नोव्हेंबर) मतदान होत असून मंगळवारी ( ३ नोव्हेंबर) मतमोजणी होऊन जिल्ह्याच्या सहकारातील सत्तेचे चित्र स्पष्ट होईल. निवडणूक विभागाकडून मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. २१ पैकी ११ जागा बिनविरोध

.

महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आणि भटके-विमुक्त या राखीव जागांसाठी सर्वच ३,८३७ मतदार मतदान करणार असल्याने त्यांच्या भेटीगाठींसाठी उमेदवारांची दमछाक झाली. सुमारे शंभर ते दीडशे मतदारांचे फोन लागत नसल्याचे सांगितले जात आहे. विखे-थोरात-गडाख गटाचे ८, खासदार नीलेश लंके व माजी खासदार सदाशिव लोखंडे गटाचे ७ आणि सभापती राम शिंदे गटाचे ३ उमेदवार आहेत. ९ अपक्षही नशीब आजमावत आहेत.

निवडणूक अधिकारी मंगेश सुरवसे यांनी रविवारी सकाळी मतदान साहित्याचा आढावा घेऊन ते केंद्रांवर रवाना केले. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी देविदास घोडेचोर, भाऊसाहेब खेडकर उपस्थित होते. मतदाराच्या हाती पाच राखीव जागांसाठी चार मतपत्रिकाव आवश्यकतेनुसार जेथे बिनविरोध नाही त्या ठिकाणी अधिक एक अशा पाच मतपत्रिका मतदानासाठी मिळू शकतील. महिला राखीवच्या दोन जागांसाठी सात, ओबीसी गटात पाच आणि भटके-विमुक्त गटात तीन उमेदवार आहेत. पारनेरमध्ये खा. लंके यांच्या विरोधात विखे गटाचे राहुल शिंदे यांच्यात चुरशीची लढत आहे. मागील निवडणुकीत १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या. यंदा मात्र ११ जागाच बिनविरोध करण्यात मातब्बरांना यश मिळाले. यंदाची निवडणूक तीन शक्तिकेंद्रांच्या ताकदीची तुलना करणारी ठरणार आहे. विखे-थोरात-गडाख यांची एकजूट सर्वात भक्कम दिसते, पण परंपरागत विरोधक एकत्र आल्याने स्थानिक पातळीवर नाराजीचा सूर दबक्या आवाजात उमटत आहे. विस्थापित लंके-लोखंडे गटाने ताकद लावली आहे. सभापती शिंदे गट , भाजपअंतर्गत समीकरणांत निर्णायक ठरू शकतो.

सोसायटी मतदारसंघ : पारनेरमध्ये खा. नीलेश लंके यांच्या विरोधात राहुल शिंदे (विखे-थोरात-गडाख आघाडी) आहेत. राहुरीत आ. प्राजक्त तनपुरे (आघाडी) यांच्यासमोर सत्यजित कदम (अपक्ष) यांचे आव्हान आहे. अकोलेत आ. किरण लहामटे आणि संजीवनी शिंदे. कर्जतमध्ये तुषार पिसाळ यांच्या विरोधात ज्योती शिंदे (राम शिंदे गट) आहेत. महिला राखीव (दोन जागा) : आघाडीतर्फे अनुराधा नागवडे व संगीता वाघ, लंके-लोखंडे गटातर्फे हर्षदा काकडे व संध्या महांडुळे, तसेच तटस्थ मंजुषा गुंड, अपक्ष पुष्पा गायकवाड व सुवर्णा पाचपुते. ओबीसी : आघाडीचे कारभारी जावळे, लंके-लोखंडे गटाचे जालिंदर वाकचौरे, शिंदे गटाचे अजिनाथ हजारे, तसेच अपक्ष शिवदास गुंजाळ आणि कडूचंद शेटे अशी पंचरंगी लढत आहे. अनुसूचित जाती-जमाती : आघाडीचे वैभव पिचड आणि लंके-लोखंडे गटाचे प्रशांत लोखंडे यांच्यात सरळ सामना आहे. भटके-विमुक्त : आघाडीचे गणपतराव सांगळे, लंके-लोखंडे गटाचे ऋषिकेश ढाकणे आणि अपक्ष सुभाष गिते असे तिघे आहेत. शेतीपूरक : आमदार आशुतोष काळे (आघाडी) यांना सुधीर म्हस्के (लंके-लोखंडे गट) यांच्याशी सरळ झुंज द्यावी लागेल.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search