संतापजनक:22व्या वर्षी तिसऱ्या विवाहात अडचण वाटल्याने आईने पोटच्या मुलास दगडावर आपटून मारले, मृतदेह विहिरीत फेकला; पहिला विवाह 19 व्या, दुसरा 20 व्या वर्षी
![]()
तिसऱ्या विवाहात अडचण ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच आपल्या ११ महिन्यांच्या मुलाला कपडे धुण्याच्या दगडावर आपटून निर्घृणपणे संपवल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला. या प्रकरण
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाचे १९ व्या वर्षी पहिले लग्न झाले होते. पहिल्या पतीने सोडून दिल्यानंतर तिने २०२४ मध्ये भांबार्डे येथील ३७ वर्षीय रवींद्र पवार यांच्याशी दुसरा विवाह केला. त्यांना यश हा मुलगा झाला. मात्र, रवींद्रसोबत राहण्याचा कंटाळा आल्याने ८ मार्च रोजी पूजा घरातून निघून गेली. पत्नी व मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार रवींद्र यांनी पोलिसांत दिली. यादरम्यान, २० मार्च रोजी पूजाने निघोज येथील एका तरुणाशी गुपचूप तिसरे लग्न केले.
दोन एप्रिल रोजी तिने नव्या पतीसोबत इन्स्टाग्रामवर फोटो टाकला. तो पाहून रवींद्र यांनी पूजा आणि तिच्या नव्या पतीशी संपर्क साधून मुलाला परत देण्याची विनवणी केली. नव्या पतीनेही तिला मुलगा परत देण्यास सांगितले, मात्र तिने मूल आपल्याकडे सुखरूप असल्याची बतावणी केली. ५ एप्रिल रोजी पोलिसांनी पूजाला जांबूत परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला ‘झोपेत असताना मुलगा ओट्यावरून पडून मरण पावला आणि मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकला’ असा बनाव तिने रचला. त्यामुळे पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या सखोल चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. दुसऱ्या संसारात अडचण ठरू नये म्हणून ८ मार्च रोजीच मुलाला घरी दगडावर आपटून त्याला ठार मारत मृतदेह पोत्यात भरून विहिरीत टाकला. अशी कबुलीही तिने दिल्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
मुलगा सारखा रडायचा, म्हणून दगडावर आपटले
पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पुन्हा चौकशी केली. ‘मुलगा सारखा रडत असे. मला दुसरा विवाह करायचा होता. मुलगा दुसऱ्या विवाहात अडथळा ठरत होता, म्हणून ८ मार्च २०२६ रोजी त्याचा कपडे धुण्याच्या दगडावर आपटून खून केला. एका पोत्यात मृतदेह आणि दगड भरून पोते विहिरीत फेकून दिले’, अशी कबुली तिने दिली.
