विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील घटकपक्षांमध्ये सुरू असलेली जुंपली असतानाच, शिंदे सेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या भूकंपाचे संकेत दिले आहेत. “येत्या 3 ते 4 महिन्यांत राज्यात प्रचंड मोठ्या घडामोडी घडणार असून राजकीय पटलावर मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. एकीकडे मुख्यमंत्री बदलाची चर्चा रंगते, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचे नाव पुढे येते. ही सर्व समीकरणे सध्या अत्यंत कन्फ्युज करणारी आहेत. त्यामुळे नेमके काय घडेल हे खात्रीने सांगता येणार नाही; पण पडद्यामागे निश्चितच काहीतरी मोठे शिजत आहे,” असा थेट आणि सूचक दावा संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्या विधानांवरून निर्माण झालेला तणाव, काल 29 ऑक्टोबर रोजी मुंबईत पार पडलेला अराजकीय कार्यक्रम आणि त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाकरे बंधूंची (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) उपस्थिती या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी मांडलेली ही भूमिका सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. नेमके काय चालू आहे सांगता येत नाही, पण घडामोडी नक्कीच सुरू आहेत! राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी सविस्तर भाष्य केले. “आता नेमकं काय चालू आहे हे थेट सांगता येणार नाही. एकीकडे मुख्यमंत्री बदलाची भाषा सुरू होते, तर दुसरीकडे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचेच नाव पुढे केले जाते. ही सर्व समीकरणे सध्या संभ्रम निर्माण करणारी (कन्फ्युज करणारी) आहेत. त्यामुळे आत्ताच याविषयी खात्रीलायक काही सांगणे कठीण आहे.” उलथापालथ होण्याची दाट शक्यता “सध्याच्या परिस्थितीवरून खात्रीने दावा करता येत नसला, तरी राजकारणातील जाणकार मंडळी ज्या पद्धतीचे संकेत देत आहेत, त्यावरून पडद्यामागे काही ना काही घडामोडी नक्कीच वेगाने सुरू आहेत. पुढील 3 ते 4 महिन्यांत राज्यात मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेते (कॉमन मॅन) आहेत. त्यामुळे येणारे वर्ष हे शिवसेनेचे असेल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.” आशिष शेलार आणि राज ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली हा संशोधनाचा विषय! मुंबईत काल 29 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले होते. या भेटीवर भाष्य करताना शिरसाट म्हणाले, “ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मंचावर आले म्हणजे लगेच राज्यात काही नवी राजकीय समीकरणे उदयाला येतील, असे म्हणणे चुकीचे आहे. सार्वजनिक आणि कला क्षेत्रातील कार्यक्रमात नेते एकमेकांना भेटत असतात.” शेलार-राज ठाकरे संवाद महत्त्वाचा “या भेटीमागे मूळ संशोधनाचा विषय काय असेल, तर भाजप नेते आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये झालेला नेमका संवाद! त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली, काही राजकीय रणनीती ठरली आहे का, हे तपासणे अधिक महत्त्वाचे आहे,” असा थेट संशय त्यांनी व्यक्त केला. आम्ही 2019 ला उठाव केला नसता तर भाजप सत्तेत दिसलीच नसती भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना नेत्यांवर केलेल्या आक्रमक टीकेचा शिरसाट यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. “शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही उघड वाद किंवा धुसफूस नाही, महायुतीत सगळे ठीक आहे. मात्र भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्वतःची पातळी पाहूनच विधाने करावीत. त्यांच्या अशा बेताल वक्तव्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिकृत मान्यता आहे का, असा जाब आम्हीही विचारू शकतो. 2019 च्या निवडणुकीनंतर जे काही राजकारण घडले, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला म्हणूनच आज भाजप पुन्हा सत्तेत आली आहे, याचे विस्मरण भाजपच्या नेत्यांनी होऊ देऊ नये.” ————————————————————————————— हेही वाचा… महायुती टिकवायची असेल तर झारीतले शुक्राचार्य रोखा: भाजपचा शिवसेनेला इशारा; नवनाथ बन म्हणाले-12 पक्ष फिरून आलेल्या धंगेकरांनी फडणवीसांवर बोलू नये! महायुतीविरोधात काम करणारे रवींद्र धंगेकर अब्दुल, सत्तार यांच्यावर कारवाई करा, महायुती टिकवायची असेल तर झारीतले शुक्राचार्य रोखा, असा खणखणीत इशारा भाजपने आज शिवसेनेला दिला. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांचा माकडछाप म्हणून उल्लेख केला. नवनाथ बन यांनी काल भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ प्रवीण दरेकरांसह भाजपचे इतर नेते मैदानात उतरले. आज पुन्हा विधान परिषद निवडणूक निकालावरून महायुतीमध्ये जोरदार जुंपली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search