प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील पर्यावरण, शेती, मासेमारी, आदिवासींचे अस्तित्व आणि स्थानिकांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होणार असल्याने हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज सर्वपक्षीय व वाढवण विरोधी कृती समितीच्या वतीने भव्य जनआक्रोश सभा आयोजित करण्यात आली. या सभेला उपस्थित राहून शिवसेना नेते, आमदार तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका मांडली. वाढवण बंदराच्या नावाखाली पालघरच्या नैसर्गिक संपत्तीचा विनाश सुरू आहे. समुद्रातील भराव, मोठ्या प्रमाणावरील ड्रेजिंग, डोंगरांचे उत्खनन आणि प्रस्तावित दगड-मुरूम खाणींमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे. मच्छीमारांच्या पारंपरिक व्यवसायावर संकट येणार असून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शेती, जलस्रोत, खारफुटी आणि समुद्री जैवविविधतेवर होणारे दुष्परिणाम तसेच आदिवासींचे संभाव्य विस्थापन याकडे लक्ष वेधून विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे हक्क आणि अस्तित्व पायदळी तुडवू देणार नाही, अशी भूमिका दानवे यांनी मांडली. केंद्र आणि राज्य सरकारच्या संगनमताने हा प्रकल्प पुढे रेटला जात आहे. आंदोलनाच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या आणि सरकारशी हातमिळवणी करून आंदोलनाला नुकसान पोहोचवणाऱ्या प्रवृत्तींना ओळखले पाहिजे. अशा गद्दारांना आंदोलनातून हाकलून लावले पाहिजे, असा आक्रमक इशारा देत पालघरची जल, जंगल, जमीन आणि स्थानिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी आंबदास दानवे यांनी व्यक्त केला. या सभेला वाढवण विरोधी कृती समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार कपिल पाटील, विलास पोतनीस, हितेंद्र ठाकूर, बळीराम जाधव, विनोद निकोले, सुनील भुसारा, शिवसेना उपनेते जगदाळे, ठाकरे, गिरीश राऊत, ओंकार पाटील, अनुप पाटील, अजय ठाकूर, विकास मोरे, केदार दिघे, दीपक राऊत, दीपक पवार, संजय गोपाळ, सत्यम ठाकूर, मनीष गणोरे आदी उपस्थित होते.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search