हदगावमध्ये दुचाकीस्वाराला अडवून लुटले; सिडकोत घरफोडीत २ लाखांचा ऐवज लंपास, तामसा येथे दुकानातून रोकड चोरी नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. हदगाव तालुक्यात रस्त्यावर दुचाकीस्वाराला अडवून धमकावत लुटल्याची घटना घडली, तर नांदेडच्या सिडको परिसरात बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास करण्यात आली. याशिवाय तामसा येथे दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी २७ हजार रुपये चोरून नेले. या तीनही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हदगावमध्ये दुचाकीस्वाराला अडवून लुटलेहदगाव तालुक्यातील वाळकी फाटा जाणाऱ्या रोडवर २९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास लुटमारीची घटना घडली. फिर्यादी अनंत लक्ष्मण डोरेले (वय ५७, रा. संभाजी नगर, हदगाव) हे मोटारसायकलवरून जात असताना तीन अनोळखी इसमांनी संगनमत करून त्यांची मोटारसायकल अडवली. त्यानंतर शिवीगाळ करून धाक दाखवत त्यांच्याजवळील नगदी रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा एकूण २२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. याप्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत. सिडकोत घरफोडी; २ लाखांचा ऐवज लंपासनांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडको परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली. २७ ऑक्टोबरच्या रात्री ११ ते २८ ऑक्टोबरच्या सकाळी ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम असा एकूण २ लाख ९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी आनंद एकनाथ घोडके (वय ३८, रा. सिडको, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४००/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पुढील तपास करीत आहेत. तामसा येथे दुकानातून २७ हजारांची रोकड चोरीतामसा ते भोकर जाणाऱ्या रोडवरील एका दुकानात २९ ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास चोरीची घटना घडली. दोन अनोळखी इसमांनी संगनमत करून दुकानात पाईप घेण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. दुकान मालकाचे लक्ष विचलित करून गल्ल्यातील २७ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी युवराज शंकरराव कौशल्य (वय २४, रा. तामसा, ता. हदगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी पोहोकाँ पोखरकर/नागरगोजे पुढील तपास करीत आहेत. जिल्ह्यात एकाच वेळी घडलेल्या या तीन वेगवेगळ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation मोदी-फडणवीसांचे अभेद्य गड ढासळले! नागपूर अन् वाराणसीत भाजपचा मोठा पराभव; एमएलसी निकालांचा सविस्तर लेखाजोखा