उजनीत 40.07 % उपयुक्त पाणी, यंदा पाणलोटातील शिवार हिरवागार:गतवर्षीच्या तुलनेत 20 टक्के पाणी अधिक, 25 एप्रिल रोजी नदीतून 12दिवसांचे आवर्तन सोडणा
.


पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील चालू वर्षातील पाणीसाठा समाधानकारक म्हणजे ८५.१२ टीएमसी आहे. यामध्ये उपयुक्त पाणीसाठा २१.४७ टीएमसी म्हणजेच ४०.०७ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २० टक्के म्हणजेच जवळपास १० टीएमसीने जादा आहे. दि. २५ एप्रिल रोजी नदीतून १२ दिवसांचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. तर योजनांद्वारे सोडले जाणारे पाणी सुरूच राहणार आहे. त्यामुळे यंदा पाणलोटातील सर्व योजना उन्हाळ्यात सुरू राहणार आहेत, अशी माहिती अभियंता प्रशांत माने यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणलोटातील शिवार हिरवागार राहणार आहे.
दि. ६ एप्रिल २०२५ रोजी मागील वर्षी याच दिवशी एकूण साठा ७४.८० टीएमसी तर उपयुक्त साठा ११.१४ टीएमसी (२०.७९ टक्के) होता. चालू वर्षी झालेला मुबलक पावसामुळे यंदा पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. कालवा आणि इतर सिंचन योजनेतून पाण्याचे आतापर्यंत आवर्तन सुरू आहे.
.कालव्याद्वारे : रब्बी हंगामात कालव्यातून ६.७० टीएमसी पाणी सोडले, उन्हाळी आवर्तनात आतापर्यंत ३.७८ टीएमसी पाणी वापरले, आवर्तन पूर्ण होईपर्यंत हे प्रमाण ६ ते ७ टीएमसीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सुमारे १४ टीएमसी पाणी सोडणार आहे. .नदीद्वारे : पहिल्या आवर्तनात नदीद्वारे ७ टीएमसी पाणी सोडण्यात आले असून, दुसऱ्या आवर्तनातून ६ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. तसेच २५ एप्रिलपासून नदीमार्गे १२ दिवसांचे आणखी एक आवर्तन सुरू होणार आहे. त्यातून सुमारे ६ टीएमसी पाण्याचा वापर होणे अपेक्षित आहे.
