भाजपाचा 46 वा स्थापना दिन लोणीत उत्साहात:कार्यकर्त्यांनी गावपातळीवर जनाधार वाढवावा- मंत्री विखे
![]()
भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून, तो एक विचार आहे. अंत्योदय चळवळ ते विकसित भारत असा पक्षाच्या वाटचालीचा यशस्वी प्रवास जनतेच्या दृढ विश्वासाने सुरू आहे. भविष्यात पक्षाचा जनाधार अधिक भक्कम होण्यासाठी कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर पक्षाचा विचार पोहचविण्यासाठी काम करावे, अशी अपेक्षा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या ४६व्या स्थापना दिवसानिमित्त लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह प्रवरा बॅकेंचे चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे, जेष्ठ नेते किसनराव विखे, चेअरमन नंदकिशोर राठी, चेअरमन मकरंद गुणे, व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, सोपानराव शिरसाठ, विजयराव लगड, बाजार समितीचे संचालक राहुल धावणे, सरपंच कल्पना मैड, सुनिल जाधव, जिल्हा भाजपाच्या सौ.शोभा घोरपडे, अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, एन.डी विखे, रविंद्र धावणे, अशोक धावणे, संजय आहेर, सोपान विखे, चांगदेव विखे, दिलीप विखे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख निर्माण झाली आहे. यामागे समर्पित भावनेन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे.
