बागलाण तालुक्यातील नुकसानीचा अहवाल विशेष अधिवेशनात मांडणार:अवकाळीने झालेल्या पीक नुकसान पाहणीप्रसंगी खा. डाॅ. बच्छाव यांचे आश्वासन‎

0
app_177546343169d36c0710b61_1001401621.jpg



बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळबागा आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट देत पाहणी केली. आगामी तीन दिवसीय विशेष अधिवेशनात या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर क

.

गेल्या आठवड्यात सलग चार दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गिरणा, आरम व मोसम पट्ट्यातील फळबागा आणि शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून, जनावरांच्या चाऱ्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. खासदार डॉ. बच्छाव यांनी रविवारी सटाणा, चौगाव, भाक्षी, मुळाणे, कौतिकपाडे, सारदे, मोराणे-सांडस, आसखेडा, सोमपूर, तांदुळवाडी, दरेगाव, नांदीन व ताहाराबाद आदी गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानीची माहिती प्रत्यक्ष जाणून घेतली. विशेष अधिवेशनात बागलाण तालुक्यातील नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करून केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नेते दिनेश बच्छाव, प्रकाश देवरे, यशवंत आहिरे, माजी सरपंच चेतन वनीस, श्रीकांत रौंदळ, आबा रौंदळ, योगेंद्र दात्रे, बाळासाहेब भदाणे, किशोर कदम व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed