Amravati: Electronic Media Association Gazal Mafial
अमरावती येथे १० एप्रिल रोजी ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘पुस्तकतुला’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जमा झालेली पुस्तके स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. इलेक्ट्र
.
भीमराव पांचाळे हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचा भाग म्हणून असोसिएशनने हा उपक्रम हाती घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत आणि सचिव सूरज दहाट यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भीमराव पांचाळे हे सुरुवातीपासूनच पुस्तकप्रेमी आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या पुस्तकतुलेतून जमा होणारी ग्रंथसंपदा जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांना दिली जाईल. यामुळे भविष्यात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा असोसिएशनने व्यक्त केली आहे. यावेळी असोसिएशनचे मार्गदर्शक यशपाल वरठे, उपाध्यक्ष स्वप्नील उमप, सहसचिव अनिरुद्ध दवाळे, कोषाध्यक्ष अमोल देशमुख, कार्यकारिणी सदस्य संजय शेंडे, सुरेंद्र आकोडे, अमर घटारे, शुभम बायस्कर, अनिकेत दहातोंडे आदी उपस्थित होते.
भीमराव पांचाळे हे मराठी गझल गायकीला वेगळा साज चढवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या मैफलीत ‘जखमा कशा सुगंधी, अंदाज आरशाचा…’, ‘अंदाज आरशाचा वाटे खरा असावा…’, ‘तू नभातले तारे…’, ‘आयुष्य तेच आहे…’, ‘मी किनारे सरकताना…’ अशा त्यांच्या अनेक लोकप्रिय गझला ऐकायला मिळतील. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक आणि गझलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

