श्रीक्षेत्र अंबादेवी माहुली येथेश्रीमद् देवी भागवत पारायण:चैत्र महिन्यात सप्ताहाचे आयोजन : धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
![]()
प्रतिनिधी | नांदगाव खंडेश्वर चैत्र महिन्याच्या निमित्ताने श्री.क्षेत्र अंबादेवी संस्थान, माहुली देवी येथे श्रीमद् देवी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहादरम्यान दररोज पारायण, भजन संध्या, हरिपाठ तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला. या धार्मिक सप्ताहाची सांगता हनुमान जयंतीच्या दिवशी करण्यात आली. याच दिवशी हनुमान जयंतीचा विशेष कार्यक्रमही भक्तिमय वातावरणात पार पडला. तसेच माऊली ग्राम येथे पारंपरिक गाडी ओढण्याचा कार्यक्रमही उत्साहात झाला. संपूर्ण कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने गावात आनंदाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे राजेंद्र सरोदे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
