भाजपचे 24 तासांचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले:खेळ, व्यायाम, भजन-कीर्तनाचा मेळ साधत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
![]()
भारतीय जनता पक्षाच्या वतीने चांदूर बाजार येथे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत २४ तासांचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात विविध खेळ, व्यायाम पद्धती तसेच भजन-कीर्तनाचा मेळ साधण्यात आला, ज्यामुळे वातावरण प्रेरणादायी आणि ऊर्जावान बनले होते. या शिबिरात अनेक मान्यवर वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. नयनाताई जोशी यांनी वैचारिक अधिष्ठानावर, डॉ. विलास कविटकर यांनी इतिहास व विकासावर, माधव अवघड यांनी कार्य विस्तार व दृष्टिकोनावर, तर रुपेश ढेपे यांनी कार्यपद्धतीवर माहिती दिली. साबुलाल दहिकार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी तुषार खेरडे यांनी सोशल मीडियाविषयी माहिती दिली. गजानन कोल्हे यांनी ‘मन की बात’, एआय (AI), नमो ॲप आणि सरल ॲप यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. या शिबिरातून कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी, पक्षाची विचारधारा, शासकीय योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत सखोल माहिती मिळाली. आमदार प्रवीण तायडे यांनी शिबिराला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रेरित केले. गजानन कोल्हे यांच्या प्रेरणादायी समारोपपर भाषणाने शिबिराची सांगता झाली. मंडळाध्यक्ष रमेश तायवाडे यांनीही या शिबिरात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध उपस्थिती आणि समर्पण यामुळे हे शिबिर संस्मरणीय ठरले.
