Amol Mitkari Emotional Letter Ajit Pawar Gojubavi Crash Site Baramati
![]()
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते बारामतीत एकवटले होते. मात्र, या राजकीय वातावरणात
.
२८ जानेवारी २०२६ रोजी गोजुबावी येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या मिटकरी यांनी याच ‘दुर्दैवी’ स्थळाला भेट दिली. या ठिकाणाला त्यांनी ‘बलिदान स्थळ’ असे संबोधले असून, तिथे गेल्यानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
अमोल मिटकरींनी पत्रात काय म्हटले?
आदरणीय दादा, 28 जानेवारी 2026 च्या काळ्या दिवसानंतर आज आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या बारामती पोटनिवडणुकीच्या निमीत्ताने दुसयोध गोजुबावी ह्या दुर्देवी स्थळी आलोय. बारामती मधे तुम्ही नाही म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही. आता हा शेवटचा पत्रव्यव्हार तुमच्या बलिदान स्थळी. बलिदान स्थळ म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलेल तुमचं बलिदान. तुमच्या बाबत मात्र महाराष्ट्र दुदैवी ठरला की तुम्ही दुर्देवी ठरला हे कोडं आता मरेपर्यंत उलगडणार नाही. गोजुबावीचं रहस्य या माळरानावर दबलयं.
आज माझ्या भावना निशब्द आहेत. तुम्ही दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. आता तुमचं जाणं हे गुढ राहू नये. तुम्हाला न्याय मिळाला पाहीजे. राज्यातील तुमच्या चाहत्यांना एकत्र करुन नवा लढा उभारेल. इतकीच सेवा करु शकलो. तुम्ही दिलेला बॅच आणि आय कार्ड तुमच्या चरणी अर्पण. माफी असावी!
ओळखपत्र आणि बॅच चरणी अर्पण
अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली, अशा शब्दांत आपली निष्ठा व्यक्त करताना मिटकरी यांनी त्यांना दिलेला पक्षाचा बॅच आणि ओळखपत्र (आय कार्ड) त्याच ठिकाणी अर्पण केले. “इतकीच सेवा करू शकलो, माफी असावी,” असे म्हणत मिटकरींनी आपला शोक व्यक्त केला.
हे ही वाचा…
करुणा मुंडेंही बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात:अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल, म्हणाल्या – प्रजातंत्र वाचवण्यासाठी लढणार
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच, आता या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला खरा, मात्र त्यांच्या विरोधात आता करुणा मुंडे यांनी शड्डू ठोकला आहे. करुणा मुंडे यांनी आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरल्याने बारामतीचा राजकीय पारा अचानक वाढला आहे. सविस्तर वाचा…
