शासकीय यंत्रणेला जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य हवे:किरीट सोमय्या
![]()
प्रतिनिधी | अमरावती ‘द इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स’, अमरावती येथे भाजपच्या वतीने मतदार यादी अद्ययावत करणे आणि बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने ‘विशेष गहन पुनरीक्षण’ कार्यशाळेचे आयोजन रविवार ५ रोजी करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना विशेष गहन पुनर्निरीक्षण (एसआयआर) देशाच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे आहे. त्यात शासकीय यंत्रणेला एक जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करणे कसे आवश्यक आहे, हे समजावून सागितले. सर्व कार्यकर्त्यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभागी व्हावे असे किरीट सोमय्या यांनी आवाहन केले. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदेश संयोजक किरिट सोमय्या, सोबत सह संयोजक नितीन भुतडा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रवीराज देशमुख,भाजप जिल्हाध्यक्ष मेळघाट प्रभुदास भिलावेकर भाजपा पदाधिकारी व भाजपा बूथ बीएलए आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
