अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ‘वोट बचाओ-देश बचाओ’ अभियानांतर्गत जिल्ह्यात पदयात्रा काढणार आहे. या पदयात्रेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. अमरावती-अकोला जिल्ह्यासाठी निरीक्षक शकीर सनदी यांनी ही माहिती दिली. काँग्रेस भवनात शकीर सनदी म्हणाले, भाजप नेतृत्वातील सरकारे मते चोरून विजयी झाली आहेत. त्यांना जाब विचारण्यासाठी देशभर जनमत तयार केले जात आहे. खासदार राहुल गांधी यांनीही निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. या पदयात्रेदरम्यान अमरावती जिल्ह्यात नागरिकांना भाजपने केलेली मताची चोरी समजावून ‘वोट बचाओ-देश बचाओ’ आंदोलनात सहभागी केले जाईल. शहर व ग्रामीण समिती यासाठी नियोजन करत आहे. या पत्रकार परिषदेला खासदार बळवंतराव वानखडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. वानखडे यांनी अमरावतीतही ‘वोट चोरी’ झाल्याचे सांगितले. त्यांचे मताधिक्य दीड लाखांहून अधिक झाले असते, असे ते म्हणाले. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 19 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation Maharashtra HSC Exam Registration Crisis; UDISE Technical Glitch Hits Students दुष्काळामुळे पशुपालक हतबल, जनावरे विकण्याची वेळ:चारा-पाण्याच्या टंचाईमुळे 30 टक्के पशुधन घटले, उपाययोजनांची मागणी