रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमींसह विरोधकही आक्रमक झाले आहेत. यावर आता केंद्रीय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या, आपण जर पाहिलं तर कुठलाही विकासाचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणला की त्याला विरोध करायचा आणि विरोध करण्यासाठी त्यासाठी नवीन काहीतरी परसेप्शन तयार करायचं. पर्यावरणाची हानी, जसं आपण पाहिलं की आरेच्या बाबतीत झालं, कनेक्टिंग लिंकच्या बाबतीत झालं, अटल सेतुच्या बातीत झालं. आज ते प्रोजेक्ट मार्गी लागल्याने कितीतरी दळणवळण वाढलं आहे. पुढे बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या, महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर विजेची जी कमतरता आहे, ती जर आपण भविष्यकाळात भरून नाही काढली, तर आपल्यालाही या सगळ्याला सामोरं जावं लागेल. आपण वन खात्याची जमीन ही आपण पहिल्यांदाच देऊन टाकली. त्यात 70 हजार झाडं आत्ता सुद्धा आहेत. आणि इथे एक झाड तोडण्यात येत असेल तर झाड लावण्याची देखील आपली तयारी आहे. त्यामुळे विकासाला विरोध करणं हा एकच अजेंडा विरोधकांचा आहे, अशी टीका मिसाळ यांनी केली आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. भीमाशंकरमध्ये 34 हजार नव्हे, तर 90 हजार झाडांची कत्तल!:राज्यात असे आणखी 23 प्रकल्प प्रस्तावित; विजय कुंभारांनी थेट यादीच दाखवली रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमींसह विरोधकही आक्रमक झाले आहेत. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भीमाशंकर जंगलात 34 हजार नव्हे तर तब्बल 90 हजार झाडांची कत्तल होणार आहे. तसेच, भीमाशंकरप्रमाणेच राज्यात इतर 23 ठिकाणीही अशाच प्रकल्पांसाठी लाखो झाडे तोडली जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वाचा सविस्तर What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 5 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation उजाड जमिनीवर प्रकल्प करा, भीमाशंकरचे जंगल का नष्ट करताय?:हुसेन दलवाईंची सरकारवर टीका; SIR अन् 500 कोटींच्या क्लिपवरूनही तोफ डागली मंत्रिमंडळाचे 12 मोठे निर्णय:दुष्काळग्रस्त दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार अग्रीम, दिव्यांगांसाठी 1 टक्का निधी, ई-व्हेईकलसाठी अनुदान