Category: महाराष्ट्र

पुण्यात डीजेवरून वाद पेटला!:विद्यानंद बापटांवर 'नक्षली'चा आरोप, गुन्हा दाखल करण्याची शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींची मागणी

पुण्यात गणेशोत्सव काळात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या बैठकीनंतर विद्यानंद बापट हे नाव चर्चेत आले असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपण नास्तिक…

सातारा जिल्ह्यात शाळा आणि आरोग्य केंद्रांचा होणार कायापालट:विकासकामांना गती देण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश

शाळांच्या भौतिक सुविधांपासून प्राथमिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणापर्यंत सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली असून, तब्बल ३२४ कोटी रुपयांच्या निधीतून २०९ प्राथमिक शाळा आणि २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट…

'दिव्य मराठी' इम्पॅक्ट:आधार व वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील नावाच्या तफावतीची परिवहन विभागाकडून गंभीर दखल

आधार कार्डवरील नाव आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील (स्मार्ट कार्ड) नावात तफावत असल्याने वाहन हस्तांतरण, नाहरकत प्रमाणपत्रासह विविध कामे ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात दिव्य मराठीने…

डफरीन रुग्णालयातील अग्निकांडात दोषी कोण, हा प्रश्न कायम:तीन नवजात बालकांच्या मृत्यूचा चौकशी अहवाल अजूनही शासनाकडे नाही

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन) एसएनआयसीयूमध्ये २२ ऑगस्ट रोजी व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली होती. मात्र,…

माघाठाण्यात रंगणार 'मातृभाषा शिक्षण जागर दहीहंडी'चा थरार:मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुटणार हंडी

मुंबईतील मराठी शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बोरीवलीतील माघाठाणे येथे भव्य ‘मातृभाषा शिक्षण जागर दहीहंडी’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माघाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश…

विद्यार्थ्यांच्या भूतबाधेचे भय घालवण्यासाठी कलेक्टर, एसपींचा आश्रमशाळेत मुक्काम:आदिवासींचा लढवय्या इतिहास सांगितला; सीईओ, प्रकल्प अधिकारीही सोबत होते

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी मुक्काम केला. भूतबाधेच्या भीतीने काही विद्यार्थ्यांनी शाळा सोडून घरी जाणे पसंत केले होते. ही भीती दूर करण्यासाठी…

Pune Entrepreneur Grievance Cell Launched; Monthly Meeting Scheduled

पुणे जिल्ह्यात उद्योजकांच्या शासकीय आणि प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण कक्ष आणि मैत्री सेल सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाची पहिली बैठक…

पत्नीचा खून, पोटच्या मुलावर चाकूने हल्ला:फरार माजी सैनिकाचा अखेर भीमा नदीकाठी मृतदेह आढळला

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरात घडलेल्या एका कौटुंबिक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतःच्या 17 वर्षीय मुलावरही जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप असलेला माजी सैनिक महेंद्र शिवाजी…

डॉ. राजेंद्र रूपनवर आत्महत्या प्रकरण:फलटण उपजिल्हा रुग्णालयाला हजारो नागरिकांचा घेराव, प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तत्कालीन तदर्थ वैद्यकीय अधिकारी राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांसाठी बुधवारी हजारो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयासमोर घेराव घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सकाळपासून कडेकोट बंदोबस्त ठेवला…

"बाळासाहेबांनंतर पक्षात निवडणुका होत नव्हत्या, मनमानी होत होती":एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल, मराठा आरक्षणावरही मोठं विधान

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेत लोकशाही पद्धतीने निवडणुका होत…

You missed

Home
Account
Cart
Search