ईरान-अमेरिका संघर्ष आता केवळ सीमित लष्करी कारवाई राहिलेला नाही; तो थेट जागतिक शक्ती संतुलनाला हादरा देणारा युद्धाचा उंबरठा बनला आहे. ईरानने अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 आणि F-15E Strike Eagle फायटर जेट्स पाडल्याचा दावा करत वॉशिंग्टनला थेट जागतिक पातळीवर लाजिरवाण्या परिस्थितीत उभे केले आहे.
कराज येथील पुलावर झालेल्या हल्ल्यानंतर ईरानने स्पष्ट इशारा दिला आहे आता प्रत्युत्तर फक्त शब्दांत नाही, तर लक्ष्य निश्चित करून दिले जाईल. अमेरिकेने ईरानी पायाभूत सुविधांवर हल्ला केल्यास खाडी परिसरातील महत्त्वाचे पूल युद्धभूमी बनतील. ईरानने संभाव्य लक्ष्य म्हणून Sheikh Jaber Al-Ahmad Bridge (कुवैत) आणि King Fahd Causeway (सौदी-बहरैन मार्ग) यांसारख्या धोरणात्मक पुलांची यादी जाहीर करून संपूर्ण मध्यपूर्वेला थेट युद्धाच्या छायेत आणले आहे.अश्या एकूण आठ पुलांची यादी इराणने जाहीर केली आहे.
ईरानची ताकद पारंपरिक युद्धात नाही, तर १५ वर्षे आखलेल्या असममित युद्धनीतीत आहे. स्थिर एअरबेसऐवजी नागरी ट्रकसारखे दिसणारे मोबाइल मिसाइल लाँचर, विखुरलेली कमांड सिस्टीम आणि सतत बदलणारी तांत्रिक रणनीती यामुळे अमेरिकेच्या महागड्या लष्करी प्रणाली निष्प्रभ ठरत आहेत. IRGC हजारो नवीन सैनिक तयार करत असून संपूर्ण राष्ट्र युद्धस्थितीत ढकलले जात आहे.
तंत्रज्ञानाच्या आघाडीवरही खेळ मोठा आहे. चीन थेट रणांगणात नसला तरी चिप टेक्नॉलॉजी, निरीक्षण आणि रणनीतिक मदतीद्वारे अमेरिकेच्या हालचालींचा अभ्यास करत असल्याची चर्चा वाढली आहे.
दरम्यान हार्मज़ जलडमरूमध्यावर नियंत्रण ठेवण्याचा ईरानचा डाव अमेरिकेसाठी सर्वात मोठा दबावबिंदू ठरत आहे. तेलपुरवठा रोखण्याची क्षमता ईरानकडे असल्याने जागतिक बाजार हादरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या मार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ लागेल असे संकेत दिले, तर ईरानने ड्रोन हल्ल्यांद्वारे तणाव उघडपणे वाढवला आहे.
पेंटागन आतूनही तणावाखाली आहे. संरक्षणमंत्री Pete Hegseth यांनी मोठी लष्करी साफसफाई करत Randy George, David Hodne आणि William Green Jr. यांसारख्या वरिष्ठ जनरल्सना पदावरून हटवले. जमिनीवरील युद्धनीतीवर अमेरिकन नेतृत्वात तीव्र मतभेद उघड झाले आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये राजकीय भूकंप सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. Kash Patel, Daniel Driscoll आणि Lori Chavez-DeRemer यांच्याबाबतही पदबदलाच्या चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे म्हणजेच युद्ध बाहेरच नाही, तर अमेरिकेच्या सत्ताकेंद्रातही सुरू आहे.
इस्रायलमध्ये Petah Tikva येथे ड्रोन उत्पादन केंद्रांवर हल्ल्यांचे दावे करत ईरानने संघर्षाची व्याप्ती वाढवली आहे. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचा प्रस्ताव चीन, रशिया आणि फ्रान्सच्या विरोधामुळे कोसळला, ज्यामुळे वॉशिंग्टनची आंतरराष्ट्रीय पकड सैल होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
युद्ध आता बंदुका आणि बॉम्बपुरते मर्यादित नाही तेल, डॉलर, तंत्रज्ञान आणि राजकीय दबाव यांचा हा सर्वसमावेशक संघर्ष बनला आहे. ईरान युरो किंवा रियालमध्ये व्यापार करण्याचा पर्याय पुढे करत अमेरिकेच्या पेट्रो-डॉलर वर्चस्वालाच खुलं आव्हान देत आहे.
संदेश स्पष्ट आहे
हा संघर्ष केवळ दोन देशांमधला नाही; तो जागतिक शक्तींच्या नव्या व्यवस्थेचा निर्णायक क्षण ठरू शकतो आणि प्रत्येक पूल, प्रत्येक जनरल आणि प्रत्येक निर्णय आता युद्धाचा भाग बनला आहे.
