[ads1]
![]()
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाई करत असल्याने त्यांच्याकडे नागरिकांकडूनही अनेक तक्रारी केल्या जात आहेत. आता ‘सैराट’ चित्रपटातील सल्या या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता अरबाज शेख याने तुकाराम मुंढे यांचे कौतुक करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अरबाज शेखच्या वडिलांवर काही दिवसांपूर्वी उपचार सुरू होते. त्यावेळी हॉस्पिटलशी संबंधित काही बाबींवर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला होता. त्याने हॉस्पिटल प्रशासनाकडून होणाऱ्या कथित आर्थिक गैरप्रकारांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्यात आल्याचा उल्लेख अरबाजने आपल्या नव्या व्हिडिओमध्ये केला आहे. तुकाराम मुंढेंचे मानले आभार अरबाजने आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुकाराम मुंढे यांचे आभार मानले. हॉस्पिटलविषयी यापूर्वीही अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची भूमिका मुंढे यांनी घेतल्याचे अरबाजने म्हटले आहे. वैद्यकीय क्षेत्रात काही ठिकाणी रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी समोर येतात. मात्र, या प्रक्रियेत संबंधित हॉस्पिटलची भूमिका आहे का, याचाही तपास होणे आवश्यक असल्याचे अरबाजने म्हटले आहे. डॉक्टरांच्या रेफरलपासून सीटी स्कॅनपर्यंत प्रश्न अरबाजने आपल्या व्हिडिओमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील काही पद्धतींबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. एका डॉक्टरने रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवल्यानंतर त्यामागे आर्थिक कमिशन दिले जाते का, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. याशिवाय रुग्णांना ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देताना होणारे कथित आर्थिक व्यवहार आणि सीटी स्कॅनसारख्या तपासण्यांसाठी रुग्णांना विशिष्ट ठिकाणी पाठवताना कमिशनची देवाणघेवाण होते का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्याने केली आहे. मात्र, हे सर्व आरोप असून त्यांची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. किती हॉस्पिटल नियमांनुसार नोंदणीकृत? राज्यातील हॉस्पिटल्स नियमांनुसार नोंदणीकृत आहेत का, याचीही तपासणी करण्याची गरज असल्याचे अरबाजने म्हटले आहे. कोणत्या हॉस्पिटलची आवश्यक नोंदणी आहे आणि कोणते हॉस्पिटल नियमांचे पालन करत नाही, याची माहिती समोर येणे गरजेचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आपल्या कुटुंबासोबतही अशाच प्रकारचा अनुभव आल्याचे अरबाजने सांगितले. त्या वेळी तुकाराम मुंढे यांनी कारवाई केल्याबद्दल त्याने वैयक्तिकरित्या त्यांचे आभार मानले आहेत. ‘महाराष्ट्राला अशा अधिकाऱ्यांची गरज’ तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या पद्धतीचे कौतुक करताना अरबाजने महाराष्ट्राला प्रामाणिकपणे आणि नियमांनुसार कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचे म्हटले आहे. आपल्या कुटुंबाच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर मुंढे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आपण त्यांचे आभारी असल्याचेही त्याने सांगितले. दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या कारवायांमुळे सोशल मीडियावरही त्यांची चर्चा होत आहे. एखाद्या ठिकाणी नियमबाह्य प्रकार किंवा गैरप्रकार आढळल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात आला, तर काही जण थेट मुंढे यांना टॅग करून संबंधित माहिती देत आहेत. ‘रुग्ण हा ग्राहक नाही, तो एक माणूस आहे’ अरबाजने या व्हिडिओसोबत एक कॅप्शनही लिहिले आहे. ‘रुग्ण हा ग्राहक नाही, तो एक माणूस आहे’ असा संदेश त्याने दिला आहे.
मात्र, सर्व डॉक्टर किंवा हॉस्पिटल्स गैरप्रकार करतात, असा आपला दावा नसल्याचेही अरबाजने स्पष्ट केले आहे. आजही अनेक डॉक्टर आणि हॉस्पिटल्स प्रामाणिकपणे, माणुसकीच्या भावनेने आणि सेवाभावाने रुग्णांवर उपचार करत असल्याचे त्याने नमूद केले आहे. अशा डॉक्टर आणि हॉस्पिटल्सबद्दल आपल्याला पूर्ण आदर असल्याचे त्याने सांगितले.आपला मुद्दा हा प्रामाणिक डॉक्टरांच्या विरोधात नसून, रुग्णांच्या अडचणीचा किंवा त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेणाऱ्या पद्धतींविरोधात असल्याचे अरबाजने स्पष्ट केले आहे. वडिलांच्या निधनानंतर पुन्हा मांडला मुद्दा अरबाज शेखच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्याआधी वडील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना अरबाजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने हॉस्पिटलशी संबंधित काही अनुभव आणि कथित आर्थिक गैरप्रकारांविषयी प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर आता त्याने पुन्हा व्हिडिओ शेअर करत तुकाराम मुंढे यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे अरबाजची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हेही वाचा.. कणकवलीतले खून पचवण्यासाठी यांना सत्ता हवी!:दिशा प्रकरणात ठाकरे कुटुंबावर चिखलफेकीसाठी अर्थपुरवठा कोठून होतोय? संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल “दिशा सालियन प्रकरणात केवळ ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून हा घाणेरडा राजकीय खेळ सुरू आहे. अब्रूची भाषा बोलणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आमचीही प्रतिष्ठा आणि मानमर्यादा आहे. कोणाच्या तरी हातचे बाहुले बनून आरोप करणाऱ्यांच्या पाठीशी कोणती अदृश्य शक्ती आहे आणि या संपूर्ण प्रकरणासाठी अर्थपुरवठा कुठून केला जातोय, हे आम्हाला पक्के ठाऊक आहे,” असा सणसणीत प्रतिहल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी चढवला आहे. सविस्तर वाचा..
[ads2]
अरबाज शेखकडून तुकाराम मुंढेंचे कौतुक:‘रुग्ण हा ग्राहक नाही, तो एक माणूस आहे’, हॉस्पिटलमधील कथित गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
















Leave a Reply