[ads1]
![]()
बारामती येथील पणदरे येथे घरात बेडरूममध्ये झोपलेल्या विवाहितेच्या चेहऱ्यावर व डोक्यावर वार करून तसेच टॉवेलने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली असून वैशाली तानाजी पवार (वय 30) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी महिलेची सासू रंजना लक्ष्मण पवार यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणदरे गावच्या हद्दीत वैशाली पवार यांची त्यांच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केला. आरोपीने प्रथम त्यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर अज्ञात हत्याराने जोरदार मारहाण केली आणि त्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांची हत्या केली, असे दाखल झालेल्या फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. उपविभागीय पोलिस अधिकारी कदम यांनी शनिवारी रात्री साडेनऊ ते रविवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत घटनास्थळी थांबून सविस्तर पाहणी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ करत आहेत. या हत्येमागचे नेमके कारण आणि आरोपीची ओळख अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून अज्ञात मारेकऱ्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. पत्नीला प्रसूतीसाठी सोडून परतताना भीषण अपघात; गाडी खड्ड्यात कोसळून दोघांचा मृत्यू पत्नीला प्रसूतीसाठी सोडून परतत असताना पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर बाह्यवळण मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री मोरडेवाडीच्या हद्दीत घडली. आनंदराव शंकर कोळेकर (वय 53, रा. करंजविहिरे) आणि किरण बाबूराव डुंबरे (वय 35, रा. दावडी) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. किरण डुंबरे हे आपल्या पत्नीला बाळंतपणासाठी करंजविहिरे येथे सोडून परतत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे या दुर्दैवी पित्याला आपल्या जन्माला येणाऱ्या बाळाचा चेहराही पाहता आला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण डुंबरे हे आपले मित्र आनंदराव कोळेकर यांच्यासोबत पत्नीला सोडून आळेफाटा येथे उपचार घेत असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी निघाले होते. या प्रवासात आनंदराव कोळेकर गाडी चालवत होते. त्यांची गाडी मंचर बाह्यवळण मार्गावरून मोरडेवाडी गावच्या हद्दीत आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले. परिणामी, त्यांची गाडी थेट 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोघांनाही जागीच आपले प्राण गमवावे लागले.
[ads2]
बारामतीत विवाहितेचा बेडरूममध्ये निर्घृण खून:डोक्यावर वार करून टॉवेलने आवळला गळा; अज्ञात मारेकऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू
















Leave a Reply