[ads1]
![]()
आंबे दिंडोरी सारख्या ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू धनश्री अनिल राठी हिने स्पेनमध्ये पार पडलेल्या ‘कॅटलॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ मालिकेत चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. ‘ माय स्पोर्ट ट्रिप इंडिया”चे अंकित दलाल यांच्यामार्फत ती या स्पर्धेत सहभागी झाली होती. स्पेनमधील पाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये धनश्रीने एकूण १४४ रेटिंग पॉईंट्सची कमाई करत आपली एकूण रेटिंग १९६५ वर पोहोचवली. यासह तिने ५९० युरो रोख पारितोषिक आणि मानाची ट्रॉफी पटकावली. व्हॅलेन्शिया कुणा बी ग्रुप स्पर्धेत तिने पाचवा क्रमांक, तर सेंट मार्टि सिटी स्पर्धेत उपविजेतेपद मिळवत ४०० युरो जिंकले. या संपूर्ण मालिकेत तिने सीएम फेंड्रिक मायकेल, डब्ल्यू सीएम राजन्या दत्त आणि डब्ल्यू सीएम लॅम्पू मेरियाना यांसारख्या दिग्गज खेळाडूंना पराभूत केले. विशेष म्हणजे, धनश्री स्वतः ‘डी चेस झोन अकॅडमी’मार्फत विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे धडे देऊन स्वखर्चाने खेळते. तिला ईशान चेस अकॅडमीचे संचालक अमित तारे, ओंकार जाधव, संदीप नागरे, प्रथमेश धर्माधिकारी आणि शरद तिडके यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल खासदार भास्कर भगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, माहेश्वरी समाज आणि आंबे दिंडोरी ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे.
[ads2]
दिंडोरी:कॅटलॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंबे दिंडोरी येथील धनश्री राठीचे यश
















Leave a Reply